वाणेवाडी विज पडून दोन महिलांचा मुत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

तेर (जि. उस्मानाबाद) : शेतात काम करणाऱ्या दोन शेतमजूर महिलांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. वाणेवाडी (ता. उस्मानाबाद) येथे गुरुवारी (ता. २१) दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

वाणेवाडी परिसरात दुपारी ढगाळ वातावण निर्माण होऊन पावसाला सुरवात झाली. यावेळी विजांचा कडकडाटही सुरू होता. दुपारी अडीजच्या सुमारास वाणेवाडी शिवारात वीज कोसळल्याने शीतल तुळशीराम घुटूकडे (वय ३२) व शालूबाई बबन पवार (वय ५०) या जागीच ठार झाल्या.

तर कौशल्या शेषेराव सरवदे (वय ४५), श्यामल लहु सरवदे (वय ४०), छाया भास्कर सरवदे (वय ५०) या तीन महिला जखमी झाल्या. या सर्व महिला गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात मजुरीने काम करीत होत्या. जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा सुरू केला आहे.

Web Title: Wanewadi lightning two women's death