Ambad News : रोहीलगड येथील वारकरी रामेश्र्वर पाटील यांचे पंढरपूरला पायी दिंडीत जाताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
शेतकरी रामेश्र्वर लिंबाजी पाटील हे वारकरी संप्रदायातील असून गत अनेक वर्षापासून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी दिंडीत नित्यनियमाने न चुकता जातात.
अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील रोहीलागड येथील वारकरी रामेश्र्वर लिंबाजी पाटील (वय-55) वर्षे यांचे सोमवारी (ता. 30) दुपारी दोन वाजता माऊलीच्या दिंडीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी दिंडीत सहभागी झाले होते.