‘कोरोना’च्या संकटात दक्ष राहावे ः आमदार जवळगावकर

hadgav.jpg
hadgav.jpg


हदगाव, (जि.नांदेड) ः कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार केला असून या महामारी रोगावर मात करण्याकरिता प्रत्येक नागरिकाने ‘मीच माझा रक्षक’ समजून आपली काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या घरातच राहून या महामारी रोगावर विजय प्राप्त करता येईल. परंतु, सोबतच प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज असल्याचे सांगत असतानाच स्वतःला समाजापासून वेगळं करण्याची वेळ प्रत्येकावर आलेली आहे. येथील प्रशासनाकडून कोरोना रोगाबाबतचा आढावा येथील आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी घेतला.

आपल्यासमोर दुसरा काही मार्गही नाही
या वेळी तहसीलदार जीवराज डापकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. जी. ढगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. कोरोना महामारीने आज प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरात कोंडून टाकले असले तरी या महामारी रोगावर विजय मिळवित असताना आपल्यासमोर दुसरा काही मार्गही नाही. एकमेकांपासून दोन फुटांचे अंतर ठेवून, आपले हात वारंवार साबन अथवा डेटॉलने स्वच्छ धुवा, शिंकतांना किंवा खोकताना नाका-तोंडावर रुमाल घेणे, गर्दीत जाणे टाळणे, अत्यावश्यक काम नसल्यास आपल्याच घरात बसून राहणे याच चार - पाच बाबींचे काटेकोरपणे पालन आजघडीस प्रत्येक नागरिकाने करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अशोक चव्हाण यांसह प्रशासनाच्या प्रत्येकाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आणि आपण स्वतः व आपल्या कुटुंबास आणि पर्यायाने आपल्या समाजास या महामारी रोगापासून वाचवावे आणि या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रत्येकाने आपापल्या घरातच बसून राहावे, असे आवाहनही आमदार जवळगावकर यांनी या वेळी बोलताना केले.

हेही वाचा -  नववी, अकरावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच
देशातील प्रत्येक नागरिक आज पंतप्रधानांनी केलेल्या २१ दिवसांच्या आवाहनास प्रतिसाद देत आहे. कोणीच घराबाहेर निघत नसून २१ दिवसांसाठी प्रत्येकाने आज आपले काम या महामारीवर विजय प्राप्त केल्यानंतर करूयात, असा निश्चय केला आहे. हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील रुग्णालये, डॉक्टर, नर्स, पोलिस यंत्रणा, पत्रकार यांचे मनापासून अभिनंदन केले. प्रशासनाकडून केल्या गेलेल्या यंत्रणेचा आढावा त्यांनी आपल्या दौऱ्यात घेऊन लक्षणे आढळून आलेल्या प्रत्येक रुग्णांची व्यवस्था, विलगीकरण, कोरोनाबाधित क्षेत्रातून पुणे, मुंबई आदी मेट्रो शहरांतून हजारो नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आदी आपापल्या गावाकडे आलेले असल्याने त्यांना शिक्के मारलेल्या व्यक्तींनी स्वतःला आपल्या कुटुंबापासून व समाजापासून दूर ठेवावे, असे आवाहन करीत प्रशासनाने अशा व्यक्तीवर नजर ठेवून राहावे, अशा सूचनाही या वेळी बोलताना दिल्या.

आपापल्या घरात बसून सहकार्य करावे

हदगाव हिमायतनगर मतदारसंघात मी कुठलाही धोका होऊ नये याकरिता दक्ष असून मतदारसंघातील प्रत्येक नागरिकानेही अशाच प्रकारे आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी व पर्यायाने आपल्या समाजासाठी पुढील काही दिवस म्हणजेच हे महामारीचे संकट टळेपर्यंत फक्त आणि फक्त आपापल्या घरात बसून सहकार्य करावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी या वेळी बोलताना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com