मराठा आरक्षणासाठी पुरुषोत्तमपुरीत तरुणांचे जलआंदोलन 

majalgao
majalgao

माजलगाव (बीड) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे; या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शुक्रवारी (ता. 27) पुरुषोत्तमपुरीत तरुणांनी गोदावरी नदीपात्रात जल आंदोलन सुरु केले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संपूर्ण राज्यातील मोठ्या शहरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातही पोहोचली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुरुषोत्तमपुरी येथील मराठा तरुणांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून जल आंदोलनाला सुरुवात केली आहे. गोदावरी नदीपात्रातील पाण्यात जाऊन तरुणांनी घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. राज्यभरातील मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असताना झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.

चार दिवसांपूर्वी अशाच आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलीस, महसूल प्रशासनाने घाबरदारी घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय पाण्यात होड्या, दोर, जीवरक्षक आदी उपाययोजना केल्या असून स्वतः सहायक पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार  या आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. या आंदोलनात विजय दराडे, उमेश गोळेेकर, रविराज पवार, परमेश्वर शेळके यांच्यासह अनेक तरुणांनी सहभाग घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com