पक्ष्यांच्या पाण्यासाठी बसविले चिमणगाथ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

बीड - तापमानात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे आता जलस्रोत कोरडे पडत आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी "यिनर्स'च्या पुढाकाराने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरातील महाविद्यालयांत चिमणगाथ बसवण्यात आले. 

शहरातील बंकटस्वामी महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य मिरगणे यांच्या हस्ते सोमवारी (ता.20) चिमणगाथ बसविण्यात आले. या वेळी "यिन'चे जिल्हा उपाध्यक्ष गवळीराम वीर, सदस्य मयूर मोहिते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. चिमणगाथांमध्ये दररोज पाणी टाकण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच शिरूर (कासार) येथील कालिकादेवी महाविद्यालय परिसरात "यिन' सदस्यांकडून चिमणगाथ बसविण्यात आले. प्राचार्य पी. बी. देशमाने, संजय तुपे, "यिन' सदस्य गडदे रामसिंग पवणे यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले. या वेळी प्राचार्य देशमाने यांनी आजच्या काळातील वाढत्या कारखानदारीने निर्माण होत असलेल्या प्रदूषणातून नैसर्गिक अधिवास व पशुपक्ष्यांच्या ऱ्हासावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

Web Title: Water for birds