माजलगाव धरणातून पुन्हा विसर्ग सुरू, अकरा दरवाजांमधून पाणी सोडले

कमलेश जाब्रस
Monday, 12 October 2020

दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर बरसलेल्या परतीच्या पावसामुळे व धरण कार्यक्षेत्रातही जोरदार हजेरी लावल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.

माजलगाव (जि.बीड) : दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर बरसलेल्या परतीच्या पावसामुळे व धरण कार्यक्षेत्रातही जोरदार हजेरी लावल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी धरणातून सिंदफणेत अकरा दरवाजांमधून २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोमवारी (ता.१२) पहाटे सोडण्यात आले. जून महिन्याच्या सुरवातीपासूनच या वर्षी वरूणराजाने दमदार हजेरी लावत जोरदार बॅटींग केलेली आहे.

त्यामुळे जुन महिन्यांपासूनच धरण भरण्यास सुरवात झाली. दरम्यान जुलै महिन्याचे काही दिवस कोरडे गेल्याने जायकवाडी धरणातुन कालव्याद्वारे माजलगाव धरणात पाणी आले होते. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढला होता आणि त्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात व परिसरात बरसलेल्या पावसामुळे माजलगाव धरण १६ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले. त्यामुळे धरणातून सिंदफणा नदीपात्रात जवळपास २३२ दशलश घनमीटर पाणी सोडण्यात आले.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली

मागील दहा दिवसांपासून गायब असलेल्या वरूणराजाने शनिवारीपासून (ता.दहा) बरसत असल्यामुळे धरणात मोठी पाण्याची आवक झाली. त्यामुळे सोमवारी पहाटे धरणातून अकरा दरवाज्यातुन २२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीत करण्यात आला आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Discharge Starts From Majalgaon Dam Beed News