औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील वॉटर गन एकाच वर्षात बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

औरंगाबाद : तापमान चाळीस अंशापर्यंत पोचले असल्याने सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची कासावीस वाढली आहे. प्राण्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी  प्रशासनाने वाघ, बिबटे, साप यांच्यासाठी कुलर सुरू केले आहेत. वाघांसाठी लाखो रुपये खर्च करून वॉटर गन लावण्यात आली होती मात्र ती एकाच वर्षात बंद पडली. दुरुस्तीसाठी यांत्रिकी विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात वाघ, बिबटे, तरस यासारखे हिंस्र प्राणी आहेत. त्याच बरोबर नीलगायी, हरिण, कोल्हे लांडगे असे सुमारे दीडशे वन्यजीव आहेत. या प्राण्यांना उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागतो. वाघांसाठी तीन ठिकाणी पिंजरे असून, त्यात हौद बांधून पाणी सोडण्यात येते. असे असले तरी वातावरणात गारवा निर्माण करण्यासाठी दरवर्षी कुलर लावण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. शनिवारी 39 अंश एवढे तापमान नोंदविले गेले. त्यामुळे गेल्या आठवड्यातच दहा कुलर सुरू करण्यात आले आहेत. वाघ, बिबट्यांचे पिंजरे व सर्पालयात हे कुलर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे.

गतवर्षी लाखो रुपये खर्च करून दोन वॉटर गन लावण्यात आल्या होत्या. या गनव्दारे पाण्याचे फवारे वाघांचे वास्तव्य असलेल्या भागात सोडले जात होते. त्यामुळे या भागातील तापमान कमी होण्यास मदत होत होती. मात्र एकाच वर्षात वॉटर गन बंद पडल्या.

Web Title: water gun for animals in aurangabad zoo not working