पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डात वर्क;  नगरसेवकांना नो नेटवर्क 

water supply
water supply

औरंगाबाद - शहरातील पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नो नेटवर्कच्या नावाखाली प्रशासनातर्फे नगरसेवकांच्या फायली रोखल्या जात आहेत; तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डातील फायली झपाट्याने मंजूर होत असल्याने खदखद वाढली आहे. दूषित पाण्याची समस्या दीड-दीड वर्षापासून सुटत नसल्याने आगामी काळात शहरातील पाणीप्रश्‍न पेटण्याची शक्‍यता आहे.

पाणीप्रश्‍नावरून बुधवारी (ता. सहा) महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी वॉर्डातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली निघत नसल्याने व त्यात अधिकाऱ्याने उद्धटपणाचे वर्तन केल्याने थेट महापौरांच्या अंगावर राजीनामा भिरकाविला. नगरसेविका मीना गायके यांच्या वॉर्डातही गेल्या चार वर्षांपासून दूषित पाण्याची समस्या आहे. सविता कुलकर्णी या वारंवार दूषित पाण्याचा प्रश्‍न मांडत आहेत. येथील समस्या सोडविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. दरम्यान, ज्या भागात अद्याप पाइपलाइन नाहीत त्या भागात पाणीपुरवठ्याची कामे न करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत प्रशासनातर्फे मांडण्यात आला. त्याला मंजुरीही देण्यात आली. त्यानुसार नव्या कामांच्या फायली रोखल्या जात आहेत. दूषित पाण्याचा प्रश्‍न मिटेना, नवीन पाइपलाइनची कामे होईनात यामुळे नगरसेवकांमधील खदखद वाढली आहे. नगरसेवकांच्या फायली रोखल्या जात असताना पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डात मात्र विकासकामांची गंगा वाहत आहे. महापौर, उपमहापौर, सभागृहनेते यांच्या वॉर्डांत कामांचा धडका सुरू असताना आमच्या भागातील साधे-साधे विषय का मार्गी लागत नाहीत, असा प्रश्‍न नगरसेवक आता पक्षनेतृत्वाला विचारत आहेत. 

तीन दिवसांनंतरही चित्र कायम 
सर्वसाधारण सभेत झाल्यानंतर तरी प्रशासकीय स्तरावर कामाची हालचाली होतील, अशी नगरसेवकांना अपेक्षा होती. पुंडलिकनगर वॉर्डात अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामाची पाहणी केली. दीड वर्षापासून या ठिकाणी दूषित पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी खोदकाम सुरू आहे; मात्र सात गल्ल्यांमधील पाणीप्रश्‍न मिटला नाही. त्याचे कारणही तसेच आहे. खाली पाइपलाइन व वर ड्रेनेजलाइन असे चित्र पुंडलिकनरात आहे. अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही काम मार्गी लागले नसल्याचे श्रीमती गायके यांनी सांगितले. सुरे यांच्या वॉर्डाकडे कोणी फिरकलेही नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com