जलशुद्धीकरण प्रकल्पाची पोकलेन घालून मोडतोड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

औरंगाबाद - शहरातून वाहणारी मुख्य नदी असलेल्या खामचे पाणी स्वच्छ करण्यासाठी उद्योगांनी उभारलेल्या प्रकल्पाची मोडतोड करण्यात आली. पाइपलाइन दुरुस्तीसाठी पोकलेन थेट नदीपात्रात घातल्याने जलशुद्धीकरण यंत्रणेवर आघात झाला आहे.

खाम नदीच्या पाण्याची शुद्धी करून जायकवाडीकडे सोडण्यासाठी छावणी परिसरातील पात्रात व्हेरॉक आणि अन्य उद्योगांनी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चून पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली आहे. हा प्रकल्प दोन वर्षांपासून अनेक अडचणींना सामोरा जात असून, गुरुवारी या प्रकल्पावर नव्याने आघात झाला. जलवाहिनीच्या कामासाठी आलेले पोकलेन थेट नदीपात्रात घालण्यात आले. यामुळे नदीच्या प्रवाहावर प्रक्रिया करण्यासाठी लावण्यात आलेला दगडी पूल आणि पात्रालगत लावलेल्या झाडांची नासधूस झाली आहे. यापूर्वी तीनदा हे काम असेच अडचणीत सापडलेले आहे.

'सरकारी यंत्रणांची कोणतीही मदत या प्रकल्पाला होत नाही. खाम नदीवरील या प्रकल्पाने किमान दुर्गंधी थांबली आहे. यापुढे पाणी शुद्ध करण्यासाठी काम करायचे आहे; पण असेच सुरू राहिले तर उद्योगांनी यासाठी पैसे का द्यावेत?''
- प्रशांत देशपांडे, उद्योजक

Web Title: Water Purification Project issue damage