इंचा येथे पाण्यासाठी घागर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

 

हिंगोली : तालुक्यातील इंचा येथे पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी आर (शनिवारी) ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. लहान मुलांसह महिला घागर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. 

 

हिंगोली : तालुक्यातील इंचा येथे पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी आर (शनिवारी) ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. लहान मुलांसह महिला घागर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. 

तालुक्यातील इंचा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावात पाणीपुरवठ्याची योजना आहे. मात्र विहिरीचे पाणी आटल्यामुळे नळयोजना बंद आहे. गावात सात हातपंप असून पाणीपातळी खोल गेल्यामुळे हात पंप शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. प्रशासनाने पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी अॅड. विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला या मोर्चात लहान मुलांसह महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडले आहे. "हिंगोली पंचायत समिती कार्यालयातून संबंधित कर्मचारी येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयातून उठणार नाही", अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. दुपार पर्यंत संबंधित कर्मचारी गावात पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आहे . ग्रामसेविका मिनाक्षी पंडितकर यांनी मोर्चेकऱ्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत तोडगा निघाला नाही.

Web Title: water rally in incha