भीषण : पावणेसहा लाख लोकांची तहान टॅंकरवर

राजेभाऊ मोगल 
Wednesday, 27 May 2020

९८४ विहिरींचे अधिग्रहण : ३२१ पैकी २७६ टॅंकर खासगी 

औरंगाबाद  : उष्णतेच्या झळाचे चटके बसत असतानाच पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. सध्या मराठवाड्यात पाच लाख ८० हजार १८० लोकांची तहान टॅंकरने भागवली जात आहे. पाणी पुरविणाऱ्या ३२१ टॅंकरपैकी २७६ टॅंकर हे खासगी असून केवळ ४५ टॅंकरच शासकीय आहेत, हे विशेष. 

सध्या उन्हाचे चटके बसत असतानाच पिण्यासाठी पाणी मिळेना झाले आहे. टॅंकरची वाट पाहावी लागते. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहे. सकाळी लवकर शेतावर गेले तरच काम होते. उशीर झाल्यास उन्हाचा पारा चढलेला असल्याने काम करता येत नाही. मात्र, पाणी भरून ठेवल्याशिवाय शेतात कसे जाणार, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर असतो. टॅंकर सकाळीच येते असे होत नाही. त्यामुळे अडचण होत आहे. पिण्यास पाणी वेळेवर मिळत नसल्याने शेतात जाण्यास वेळ होतो. परिणामी कमे खोळंबतात. अशी सद्यस्थिती आहे. मराठवाड्यात हिंगोली वगळता सर्व सात जिल्ह्यांत टॅंकर सुरू करावे लागले आहेत. सर्वाधिक १३० टॅंकर हे औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये १२१, जालना ४०, उस्मानाबाद १६, लातूर २, परभणी १ असे टॅंकर सुरू आहेत. 
 

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

 • टॅंकरवर अवलंबून संख्या : पाच लाख ८० हजार १८० 
 • विभागातील टंचाईग्रस्त गावे-वाड्यांची संख्या : ३४३ 
 • शासकीय टॅंकर : ४५, खासगी टॅंकर २५६, एकूण - ३२१ 
 • अधिग्रहित विहिरींची एकूण संख्या : ९८४ 

 
टॅंकरची वाट पाहणारे जिल्हे आणि त्यावर अवलंबून लोकसंख्या 
 

 • औरंगाबाद : २ लाख ९० हजार ११७ 
 • जालना : ६९ हजार ७५९ 
 • बीड : १ लाख ८२ हजार ८९३ 
 • उस्मानाबाद : १३ हजार २४ 
 • लातूर - ४ हजार १०२ 
 • परभणी - २ हजार ५०० 
 • नांदेड - १७ हजार ७८५ 

शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity in Marathwada