पाणीपुरवठा नियोजनाअभावी जालना शहरात पाणी टंचाई

उमेश वाघमारे
सोमवार, 2 एप्रिल 2018

जालना शहरांतर्गत नवीन पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी भागांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे काही भागांचा पाणी पुरवठा मागेपुढे होत आहे. पाण्याच्या नवीन टाक्यांचे काम पूर्ण होईल पाणी पुरवठ्याच्या दिवस लांबू शकतात. 
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना.

जालना : जालना शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणामध्ये सध्यःपरिस्थितीमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. मात्र नगरपालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनाअभावी जालना शहरातील नागरिकांवर पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. सध्या नगरपालिकेकडून शहरातील काही भागांना दहा-दहा दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

जालना शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होते. गतवर्षी धरण क्षेत्रात समाधान कारक पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे जालना शहराला पाणी टंचाईच्या झळा बसणार नाही, अशी अशा होती. मात्र जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना ही जालना शहरातील पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळी नागरिकांवर आली आहे. जालना नगरपालिकेकडून सध्या शहरातील काही भागांमध्ये दहा-दहा दिवस पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकर धारकांकडून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरणामध्ये मुबलक पाणीसाठा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा नियोजनाअभावी शहरातील नागरिकांना एक हजार लिटर पाण्यासाठी 150 ते 200 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. नगरपालिकेने किमान आठ दिवसाला तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जालना शहरांतर्गत नवीन पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी भागांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे काही भागांचा पाणी पुरवठा मागेपुढे होत आहे. पाण्याच्या नवीन टाक्यांचे काम पूर्ण होईल पाणी पुरवठ्याच्या दिवस लांबू शकतात. 
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना.

Web Title: water shortage in Jalna