पाणीटंचाईचा भडका

Water
Water

परभणीतील ४६ गावे, पाच वाड्यांत ५८ टॅंकरने पाणीपुरवठा
परभणी - मे महिना सुरू होताच पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून आता बहुतांष गावांतील पाणीपुरवठ्याचे श्रोत आटले असून ग्रामस्थ रात्रंदिवस पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. आतापर्यंत २१८ गावांतील २७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे; तर ८६ हजार ६७९ लोकसंख्या असलेल्या ४६ गाव आणि पाच वाड्यांत ५८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

परभणी जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई उग्ररूप धारण करते. पाणीपातळी खालावणे आणि अत्यल्प पाऊस ही टंचाईची मुख्य कारणे असली तरी गैरव्यहारात अडकलेल्या पाणीपुरवठा योजना, गावातील राजकारण यामुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील बहुतांष गावांतील पाणीपातळी खोलवर गेल्याने यंदा भयावह पाणीटंचाई सुरू झाली आहे. गोदावरी, दुधना, पूर्णा या नद्याकाठची  गावे सोडली तर अन्य भागात पाणीबाणी सुरू आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून भूजलपातळीत घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झाळा सुरू झाल्या आहेत. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींची पाणीपातळी घटल्याने त्या त्या गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी विहीर, बोअर अधिग्रहणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २१८ गावांतील २७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये ४९ विहिरीचें अधिग्रहण टॅंकरसाठी करण्यात आले आहे. सहा शासकीय टॅंकर असून ५२ टॅंकर खासगी आहेत. पालम तालुक्यातील २७ हजार ३०४ लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ८६ हजार ६७९ लोकसंख्येला टंचाईची झळ बसली आहे. 

पालम तालुक्यातील, चाटोरी, सादलापूर (मानगीरवाडी, पेंडु खुर्द, आनंदवाडी, बंदरवाडी, रामपूर तांडा, पेंडू बुद्रुक, नाव्हा, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, सातेगाव, सातेगाव, कापसी, पारवा, पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे, बरवडी, देगाव, आहेरवाडी, गोविंदपूर, हिवरा, पांगरा लासिना, गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा, उमरा नाईक तांडा, खंडाळी, विठ्ठलवाडी, इळेगाव, गुंडेवाडी, जिंतूर तालुक्यातील मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा, घागरा, भोसी, पांगरी, पाणमोडी, सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कोथाळा, सेलू तालुक्यातील तळतुंबा, वालूर, पिंपरी गोडंगे, पिंपळगाव गोसावी, नागठाणा कुंभारी, गुळखंड, मानवत तालुक्यातील पाळोदी, सावळी, सोनुळा, हत्तलवाडी या गावांत टॅंकर सुरू झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com