तिरू नदीला वाहू लागले पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मागील चार-पाच दिवसांपासून हाळी हडरंगुळी (ता. उदगीर) भागात चांगला पाऊस झाल्याने तिरू नदी वाहू लागली असून याचा फायदा जळकोट तालुक्‍यातील तिरुका, गव्हाण, अतनूर भागातील गावांना होणार आहे. 

जळकोट(जि. लातूर)  : मागील चार-पाच दिवसांपासून हाळी हडरंगुळी (ता. उदगीर) भागात चांगला पाऊस झाल्याने तिरू नदी वाहू लागली असून याचा फायदा जळकोट तालुक्‍यातील तिरुका, गव्हाण, अतनूर भागातील गावांना होणार आहे. 

पावसाळा संपत आला तरी तिरू नदी कोरडीठाक होती. त्यामुळे ज्या भागातून नदी जाते, त्या नदीकडेच्या गावांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते.

शेतकऱ्यांची रब्बी पेरणीही धोक्‍यात आली होती. या भागात मोठ्या प्रमाणात पशुधन, वाडी-तांडे आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर होता.

मागील चार-पाच दिवसांत तिरू नदीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तिरु नदी वाहू लागली असून नदीच्या कडेच्या गावांतील शेतकरी, पशुपालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

रब्बी पेरणीची आशा वाढली असून जनावरे, नागरिकांचा पाणीपश्न थोडा फार मिटणार आहे. तिरू नदीवर बॅरेजस नसल्याने पाणी आंध्रप्रदेश, कनार्टक भागात जात आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water started flowing into the river Tiru