औरंगाबाद शहरात आता तीन दिवसांआड पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

औरंगाबाद - शहरात पाण्यावरून ओरड सुरूच असून, अर्ध्या शहराला दोन दिवसांआड पाणी दिले जात असताना सिडको - हडकोवरच अन्याय का? असा सवाल करत या भागांतील नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात मंगळवारी (ता. आठ) रात्री उशिरापर्यंत ‘झोपा काढा’ आंदोलन केले. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महापालिकेत येऊन नगरसेवकांसोबत चर्चा केली. त्यानंतर रात्री उशिरा प्रभारी आयुक्तांनी संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. 

समान पाणी देण्याच्या नावाखाली प्रशासनाने सिडको-हडको भागाचा पाणीपुरवठा प्रशासनाने एक दिवसाने वाढवला आहे, तर जुन्या शहरात दोन दिवसांआड पाणी दिले जात आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सिडको-हडकोतील नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनातच ‘झोपा काढा’ आंदोलन केले. रात्री-अपरात्री नागरिक पाण्यासाठी घरी येऊन त्रास देत आहेत. त्यामुळे आमची झोप उडाली आहे, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनाची माहिती मिळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वालही तेथे दाखल झाले. या वेळी अतिरिक्त आयुक्त भालसिंग, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्याकडे शहरात समान पाणीपुरवठा करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. सिडको-हडकोला पूर्वीप्रमाणे दोन दिवसांआड पाणी देण्याचे सभेत महापौरांनी आदेशित केल्यानंतरच चौथ्या ते पाचव्या दिवशी पाणी येत आहे. अर्ध्या शहरात दोन दिवसांआड पाणी येत असताना सिडको भागावरच अन्याय का? असा सवाल नगरसेवकांनी केला. अडीच तास खल झाल्यानंतरही तोडगा निघाला नाही. तोडगा निघाल्याशिवाय दालन सोडणार नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महापालिकेत येऊन चर्चा केली. काही वेळानंतर आमदार अतुल सावे हेही दाखल झाले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, माजी महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक शिवाजी दांडगे, पुष्पा रोजतकर, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, गौतम खरात आदींची उपस्थिती होती.

रात्रभरात वेळापत्रक तयार करा 
नगरसेवकांसोबत चर्चा केल्यानंतर प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहेल यांना रात्रभर बसून संपूर्ण शहराचे वेळापत्रक तयार करून बुधवारी (ता. नऊ) माझ्याकडे द्या, असा आदेश दिला.

Web Title: water supply issue