तेरा गाव पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : कायगाव येथून गोदावरीचे पाणी जलवाहिनीद्वारे बोरदहेगाव प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रात आणून लासूर स्टेशनसह तेरा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या हस्ते रविवारी (ता.20) करण्यात आले. या योजनेमुळे तेरा गावांतील अंदाजे एक लाख नागरिकांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणार आहे.

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : कायगाव येथून गोदावरीचे पाणी जलवाहिनीद्वारे बोरदहेगाव प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रात आणून लासूर स्टेशनसह तेरा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या हस्ते रविवारी (ता.20) करण्यात आले. या योजनेमुळे तेरा गावांतील अंदाजे एक लाख नागरिकांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणार आहे.

लासूर स्टेशनसह तेरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बोरदहेगाव प्रकल्पातून योजना करण्यात आली होती; परंतु या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने श्री. बंब यांनी पाठपुरावा करून टंचाईग्रस्त आराखड्यातून कायगाव टोका येथून बोरदहेगाव प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रात व दहेगावहून तेरा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर करून घेतली. त्याच्या लोकार्पणप्रसंगी श्री. बंब म्हणाले, ""या योजनेत कायगावपासून ते बोरदहेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात अंदाजे पंचेचाळीस किलोमीटर लांब अंतरावरून गोदावरीचे पाणी येणार आहे. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नातून मराठवाड्यातील जनतेला शाश्‍वत, हक्काचे पाणी मिळाले. यापुढे वरच्या भागातून नियमित पाणी सुटेल. याच बॅकवॉटरला तेरा गावात नेता आले याचे समाधान आहे. जनतेने पाण्याचा जपून वापर करावा.
या योजनेचे श्रेय एकट्याचे नसून, सत्ताधारी, विरोधी पक्ष, राजकीय मित्रांचे यासाठी प्रयत्न आहेत. सर्वांनी पुढाकार घेतला म्हणून ही योजना मार्गी लागली.''
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड, डॉ. बन्सीलाल बंब, जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, जिल्हा बॅंकेचे नंदकुमार गांधिले, सरपंच रश्‍मी जैस्वाल, उपसरपंच गणेश व्यवहारे, बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहायक अभियंता एम.ए.पाटील, शाखा अभियंता एस.आर.येणेवार, माजी सरपंच प्रदीप भुजबळ, मदनलाल लोंढा, हरकचंद मुथा, चंद्रकलाबाई पांडव, दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष दत्तू कऱ्हाळे, बापूसाहेब देशमुख, दिलीप पवार, अशोक सौदागर, कंत्राटदार श्री. सानप आदींची उपस्थिती होती.

या गावांना होणार लाभ

वैजापूर तालुक्‍यातील करंजगाव, हडसपिंपळगाव, लासूरगाव गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन, भानवाडी, सावंगी, धामोरी खुर्द, डोणगाव, रायपूर, दिवशी, दिवशी पिंपळगाव, पाचपीरवाडी, वरझडी या गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply Scheme Inaugarat For 13 Villages