औरंगाबादचा पाणी उपसा थांबविला 

माधव इतबारे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

औरंगाबाद : नोटीस बजावूनही महापालिकेने पाणी शुल्क भरले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने गुरुवारी (ता. 27) शहराचा जायकवाडी धरणातील पाणी उपसा टप्प्याटप्प्याने कपात करण्याची कारवाई सुरू केली. जायकवाडी धरणवरील महापालिकेचे दोन्ही पंपगृह दोन तासांसाठी सील करण्यात आले. दोन तासानंतर पुन्हा हे सील उघडण्यात आले. महापालिकेने थकबाकी न भरल्यास 31 डिसेंबरला महापालिकेचा संपूर्ण पाणी उपसा बंद करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महानगरपालिकेने जायकवाडी धरणावर 156 एमएलडी क्षमतेचे दोन योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्याद्वारे रोज 140 एमएमएलडी इतका पाणी उपसा केला जातो, परंतु महापालिकेने मागील पाच वर्षांपासून या पाणी उपशाचे शुल्क जलसंपदाकडे भरलेले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेला नोटीस बजावून पाणी उपसा बंद करण्याचा इशारा दिला होता.

जलसंपदाचे महापालिकडे आठ कोटी रुपये थकलेले आहेत. ही थकबाकी  त्वरित भरावी अन्यथा 27 डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने पाणीकपात करण्यात येईल आणि 31 डिसेंबर रोजी संपूर्ण पाणी उपसा बंद केला जाईल , असे या नोटीशीत बजावले होते. परंतु त्यानंतरही महापालिकेने ही थकबाकी भरली नाही. त्यामुळे नोटीस येथील इशाऱ्यानुसार जलसंपदा खात्याने गुरुवारी सकाळी दोन तासांसाठी महापालिकेचा उपसा थांबविला. त्यासाठी दोन्ही पंप सील करण्यात आले होते. दोन तासानंतर हे सील उघडण्यात आले

Web Title: water uptake stops of Aurangabad