ओवेसी म्हणतात, 'मैं उन्हे गोद मैं उठाने के लिए तयार हूँ'

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 3 October 2019

'वंचित सोबत आघाडीसाठी मी आज ही तयार आहे. आपण जाऊन साहेबांना हे सांगा प्लीज असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 3) सांगितले.

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी ही फक्त निवडणुकीसाठी केली नव्हती. "खुदा के लिए' हे तुम्ही समजून घ्या. प्रकाश आंबेडकर यांना कडेवर फक्त निवडणुकीसाठी उलचलले नाही. तर त्यांना "मैंने दिल से गोद मैं उठाया' आज भी मैं उन्है गोद मैं उठाने के लिए तयार हूँ' वंचित सोबत आघाडीसाठी मी आज ही तयार आहे. आपण जाऊन साहेबांना हे सांगा प्लीज असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 3) सांगितले. 

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीची शक्यता कमी असल्याने संजय शिंदेंचे ठरलं

पैठण आणि औरंगाबाद शहरातील आमखास मैदानात बुधवार (ता. 3) सभा झाल्यानंतर गुरुवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ओवेसी यांची भेट घेतली. त्यावेळी ओवेसी म्हणाले की, बाळासाहेबांना खरी माहिती कुणी ही सांगत नाही. माझ्यातर्फे त्यांना सांगा आम्ही आजपण तयार आहोत. मात्र ज्या जागांवर आमचे विद्यमान आमदार आहे ते तसेच राहु द्यावे. आम्ही औरंगाबाद पश्‍चिम देण्यासाठी तयार झालो. त्यावर इम्तियाज जलील माझ्यासोबत भांडण्यासाठी हैदराबाद पर्यंत आले. पण मी त्यांना समजावून सांगितले.

Vidhan Sabha 2019 : पुण्यात चंद्रकांतदादांना फ्लॅट देता का फ्लॅट

मी स्वतः बाळासाहेबांना सांगितले की, आघाडी झाली तर सात-आठ आमदार आमचे येतील सात-आठ आमदार तुमचे येतील. वीस जरी आमदार आले तरी ते एकच होते. आता सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगु शकत नाही. माझ्या मनात काहीच नाही. सहाब (प्रकाश आंबेडकर) यांना माझा सलाम सांगा. असे ओवेसी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we are ready for alliance says owaisi to Prakash Ambedkar