Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीची शक्यता कमी असल्याने संजय शिंदेंचे ठरलं

अण्णा काळे
Thursday, 3 October 2019

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पराभूत झालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे.

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पराभूत झालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणूकीत त्यांचे विरोधक बागल यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर संजय मामांनी विधानसभा लढवण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान रश्मी बागल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही मिळाली. त्यामुळे मामांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महादेव जानकर यांनी केले पंकजा मुंडेंचे औक्षण

राष्ट्रवादीतून बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदे यांचा राष्ट्रवादीतून मार्ग मोकळा झाला होता. मात्र राष्ट्रवादीला डचू देत अपक्ष निवडणूक लढवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. करमाळा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी निर्णय जाहीर केला.

Vidhan Sabha 2019 : सायकलवरून जाऊन ऋतुराज पाटलांनी भरला अर्ज

२०१४ ला शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा थोढक्या मताने पराभव झाला होता. त्यात शिवसेनेकडून नारायण पाटील विजयी झाले होते. दोन नंबरचे मताधिक्य राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना मिळाले होते. तर शिंदे यांना तिन नंबरचे मताधिक्य होते. तिघांमध्यही खूप कमी मतांचा फरक होता. त्यानंतर शिंदे यांनी जिल्हा परिषदेत विजय मिळवून सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन अध्यक्षपद पदरी पाडून घेतले. त्यातून त्यांनी तालुक्यात विकास कामे केली. त्याच जोरावर त्यांनी पुन्हा विधानसभा लढवण्याचा अग्रह कार्यकर्त्यांनी धरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay shinde will elect independently from karmala for vidhansabha 2019