दुष्काळाशी एकीने लढू : खा. सुप्रिया सुळे

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : "दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढीच चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच, पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा'', अशी साद बिझनेस महाएक्‍स्पोच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, व्यावसायिकांना घातली. 

शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या "बिझनेस महाएक्‍स्पो 2018'च्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये 25 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान हा एक्‍स्पो होत आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, माजी मंत्री राजेश टोपे आदींची उपस्थिती होती. 

खासदार सुळे म्हणाल्या, "शासन हे सातत्याने चालणारे काम आहे. सारखे कायदे बदलतात, त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे. सध्याचे जग आटोमेशनचे असल्याने नोकऱ्या कमीच होत जाणार आहेत. कुठल्याही सरकारसमोर हा प्रश्‍न यापुढेही तसाच असेल. त्यामुळे निवडणुकात कितीही टोकाची टीका केली तरी नंतर सोबत काम करायलाच हवे. तसेच आपल्यावर जे संस्कार आहेत ते रामायणातून झाले आहेत. ते विसरता कामा नये'', असेही सुळे म्हणाल्या. श्री. खोतकर म्हणाले, ""मराठवाड्यात मराठा समाजाचे नुकसान शेतीनेच झाले आहे. अधिकच्या शेतीमुळे पूर्वी व्यवसायात लोक उतरायचे नाहीत. आता ही परिस्थिती बदलायला हवी.'' श्री. बागडे यांनीही विचार व्यक्त केले. 

यावेळी रंगनाथ काळे, माजी आमदार कल्याण काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उद्योजक सचिन मुळे, प्रदीप सोळुंके, प्रमोद खैरनार, बालाजी शिंदे, राम पवार, शिवाईच्या पुष्पा काळे, नीता देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. रंजना देशमुख, डॉ. अनुपमा पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती. 

महाएक्‍स्पोत 140 स्टॉल्स 
महाएक्‍स्पोचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षी 140 स्टॉल्स आहेत. यात बांधकाम व्यावसायिक, इंडस्ट्रियल, ट्रेडर्स, सेवा क्षेत्र, फूड, गृहउद्योगाचे स्टॉल आहेत. उद्योगाचा परिचय देण्यासोबत ग्राहकांना स्वस्त दरात अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. उद्‌घाटनानंतर खासदार सुळे, श्री. बागडे, श्री. खोतकर यांनी स्टॉलमध्ये फिरून उत्पादनांची माहिती घेतली. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही अनेकांचे मोबाईल सरसावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com