आम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

औरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. आमच्या आमदाराला निधी नाही; पण भाजपच्या साध्या कार्यकर्त्याला मात्र वाटेल तेवढा निधी दिला गेला.

औरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. आमच्या आमदाराला निधी नाही; पण भाजपच्या साध्या कार्यकर्त्याला मात्र वाटेल तेवढा निधी दिला गेला.

याबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या आणि राज्यातील सर्वसामान्य शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या मनात राग आहे. त्यामुळे आम्हाला हे सरकार आमचे आहे असे कधी वाटलेच नाही, अशी खंत राज्याचे पशुसंवर्धन-दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. "कॉफी विथ सकाळ' कार्यक्रमात बोलताना अर्जुन खोतकर यांनी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, शिवसेना-भाजपमधील संबंध, लोकसभा निवडणूक या विषयांवर भूमिका स्पष्ट केली. 

राज्याच्या सत्तेत असूनही भाजपकडून सापत्न आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करताना खोतकर म्हणाले, 95-99 दरम्यान राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली तेव्हा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जामंत्री अशी महत्त्वाची खाती भाजपकडून मागितली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील उदार मनाने ती दिली. याउलट भाजपने काय केले? तर शिवसेनेला दुय्यम खाती दिली. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पदासह सगळी महत्त्वाची खाती भाजपने आपल्याकडे ठेवली. शिवसेनेकडे असलेल्या मंत्रालयाच्या कामातदेखील नेहमी अडवणुकीचे धोरण अवलंबले. आमच्या नेतृत्वाचा सातत्याने अपमान भाजपच्या नेत्यांनी केला. याबद्दल आमच्या आणि शिवसैनिकांच्या मनात प्रचंड राग आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीत बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. जालना लोकसभा लढवणारच... युती होवो अथवा न होवो... जालना लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणारच, असे ठामपणे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. गेल्या तीस वर्षांपासून मी आमदार म्हणून राजकारण करतोय. आता मलाही दिल्लीला जायचे आहे. युतीमध्ये जालना मतदारसंघ भाजपकडे असला तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मी मैत्रीपूर्ण लढत करणार आहे. 

Web Title: We know the government is not our says arjun khotkar