आणखी २५ जणांनी शस्त्रे मागविल्याचे निष्पन्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

औरंगाबाद - शहरातील आणखी पंचवीस जणांनी ऑनलाइन शस्त्रे मागविल्याचे निष्पन्न झाले आहे. गत तीन महिन्यांचा इन्स्टाकार्ट व फ्लिपकार्टकडून डाटा मागवला होता. यातून ही माहिती समोर आली. हे संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाने नागेश्वरवाडी व जयभवानीनगरातील इन्स्टाकार्ट या फ्लिपकार्टची को-पार्टनर असलेल्या कुरिअर कंपनीवर २८ मे रोजी रात्री छापे टाकले होते. 

यात खेळण्याच्या नावाखाली फ्लिपकार्टद्वारे मागविण्यात आलेली ऑनलाइन शस्त्रे जप्त केली होती. यात दुसऱ्या दिवशीही छापा घालून पोलिसांनी सात शस्त्रे जप्त केली. यानंतर पोलिसांनी ऑनलाइन बुकिंग होणाऱ्या फ्लिपकार्टची चौकशी सुरू केली तसेच गत तीन महिन्यांचा डाटा मागवला. डाटा प्राप्त झाल्यानंतर पंचवीस जणांनी शस्त्रे मागवल्याचे समोर आले आहे. या संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

भिवंडीत छापेमारी 
शस्त्रांचे औरंगाबाद ते भिवंडी कनेक्‍शन समोर आल्यानंतर पोलिसांची दोन पथके भिवंडीत गेली. तेथील इन्स्टाकार्टच्या कार्यालयात छापे घालून झडती घेतली. यानंतर तेथील व्यवस्थापकाचा रीतसर जबाब घेण्यात आला. कंपनीच्या विधी सल्लागारांना कंपनीची बाजू मांडण्यासाठी गुन्हे शाखेने बोलावले आहे.

Web Title: weapon crime aurangabad