esakal | लग्नाच्या घरी, धाडशी चोरी... वाचा कोठे...

बोलून बातमी शोधा

file photo

घटना सोमवारी (ता. दोन) पहाटे एक ते तीनच्या सुमारास अर्धापूर शहरात घडली. 

लग्नाच्या घरी, धाडशी चोरी... वाचा कोठे...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुलांच्या लग्नासाठी बँकेतून काढून आणलेले पाच लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन लंपास केले. ही घटना सोमवारी (ता. दोन) पहाटे एक ते तीनच्या सुमारास अर्धापूर शहरात घडली. 

अर्धापूरमधील सखाराम लंगडेनगरमध्ये राहणारे शेतकरी तथा विमा प्रतिनिधी भगवान शिवाजीराव हिंगमिरे हे आपल्या परिवारासह राहतात. एप्रीलमध्ये त्यांच्या मुलांचे लग्न असल्याने त्यांनी बँकेतून व इतर ठिकाणाहून जमावजमव करून नगदी पाच लाख रुपये सामान खरेदीसाठी जुळवले होते. त्यांनी स्टीलच्या डब्यात पैसे ठेवले होते. रविवारी (ता. एक) रात्री सर्वजन भोजन करून झोपी गेले होते.

डब्यातील रोख पाच लाख रुपये लंपास

सोमवारी पहाटे एकच्या सुमारास अज्ञात चोरटे त्यांच्या घरात पाठीमागून छतावर चढले. छताच्या दरवाजातून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटावर ठेवलेल्या डब्यातील रोख पाच लाख रुपये लंपास केले. ही बाब सोमवारी सकाळी श्री. हिंगमिरे यांच्या लक्षात आली. त्यांनी डबा उघडून पाहिले असता त्यात एकही रुपया ठेवला नव्हता. यानंतर त्यांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात जावून माहिती दिली. 

हेही वाचा जमशेदजी टाटा यांच्याबद्दलच्या या दहा गोष्टी माहिती हव्यातच

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट

पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी घटानास्थळाला भेट दिली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामिण) बाळासाहेब देशमुख यांनीही भेट दिल्यानंतर नांदेडहून श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांनी कुठलाच माग मागे ठेवला नसल्याने श्‍वान पथाकाला खाली हात परतावे लागले. 

लग्नासाठी पैशाची जमावजमव करून तयारी सुरू असतांनाच हा मोठा धक्का या हिंगमिरे परिवाराला बसला. भगवान हिंगेमिरे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक श्री.गुट्टे करत आहेत. 

येथे क्लिक कराझन्ना- मन्ना जुगारावर पोलिसांचा छापा

राज्यस्तरीय जीम्नॅस्टीकची निवड 

नांदेड : राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक ॲक्रोबॅटीक्स, ट्रम्पलींग, थंबलींग व एरोबीक्स स्पर्धेसाठी नांदेड संघाची निवड चाचणी बुधवारी (ता. चार) घेण्यात येणार आहे. ही चाचणी नांदेड जिल्हा हौशी जिम्नॅस्टीक असोसिएशन व अम्यॅच्युअर जिम्नॅस्टीक असोसिएशनच्या वतीने आयोजीत करण्यात आली आहे.
 
जिम्नॅस्टीक असोसिएशन हॉल, दीपकनगर, तरोडा (बु) येथे ता. सात व आठ मार्च रोजी सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक ॲक्रोबॅटीक्स, ट्रम्पलींग, थंबलींग व एरोबीक्स स्पर्धेसाठी येथील जिम्नॅस्टीक खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या खेळाशी संबंधीत असलेल्या सर्व खेळाडूनी उपस्थित राहून चाचणीमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे सचीव डॉ. अनिल पाटील यांनी केले आहे.