esakal | झन्ना- मन्ना जुगारावर पोलिसांचा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पाच जणांना अटक करून अड्ड्यावरुन रोख रक्कम, १३ दुचाकी व अन्य साहित्य असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी शनिवारी (ता. २९) शिवरोड परिसरात केली.

झन्ना- मन्ना जुगारावर पोलिसांचा छापा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पाच जणांना अटक करून अड्ड्यावरुन रोख रक्कम, १३ दुचाकी व अन्य साहित्य असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी शनिवारी (ता. २९) शिवरोड परिसरात केली. या कारवाईमुळे भाग्यनगर पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. 

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार असे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. स्थानिक पोलिसांना अनेकवेळा नागरिकांनी सांगुनही त्यांच्याकडून हे धंदे बंद केल्या जात नसल्याने शेवटी पोलिस अधिक्षकांना या धंद्याची माहिती देण्यात आली. शेवटी या अवैध धंद्याची दखल पोलिस अधीक्षक यांनी घेतली.

स्थानिक गुन्हेे शाखेची कारवाई

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सुचना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी आपले सहकारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांचे पथक या कामी लावले. 

हेही वाचाधुळीवंदनासाठी ‘हा’ वृक्ष सज्ज

पोलिस दिसताच काही जुगारी पसार झाले

त्यांनी गोपनिय माहिती काढून शिवरोड परिसरात हॉटेल विराटच्या पाठीमागे मोकळ्या मैदानावर झन्ना-मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती घेतली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या पथकासह श्री. मांजरमकर यांनी त्या ठिकाणी कारवाई केली. पोलिस दिसताच काही जुगारी पसार झाले. मात्र सहा जण पोलिसांच्या हाती सापडले. 

तीन लाख ९२ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त​

जुगार अड्ड्यावरुन पोलिसांनी ४७ हजार ७५० रुपये नगदी व जुगाराचे साहित्य आणि १३ दुचाकी असा तीन लाख ९२ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी शेख सुलतान अमिर शेख गुलाब, प्रमोद मधूकर गायकवाड, राहूल गणपतराव मोरे, गजानन गुणाजी शिंदे आणि राजू शामराव चापलावार यांना अटक केली. या प्रकरणी महादेव मांजरमकर यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एस. के. नरवाडे करत आहेत. 

येथे क्लिक करा - गरीबांच्या तोंडचा घास हिरावून गव्हाची काळ्या बाजारात विक्री

चिमुकले झाले भावुक

नांदेड : कुसुम सभागृहात मावळते जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (शिर्डी संस्थान) अरूण डोंगरे यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले होते, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची उपस्थिती होती.

अरूण डोंगरे यांना निरोप

विशेष आकर्षण म्हणून चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन अरूण डोंगरे यांना निरोप देतेवेळी विजयनगरमधील न्यू टायनी एन्जल्स व लिटल स्टार पब्लिक स्कूलचे विद्यार्थी भावुक झाले. यामागचे कारण विद्यार्थ्यांना विचारले असता माजी जिल्हाधिकाऱ्यांनी चिमुकल्यांना लोकमान्य टिळक निर्माल्य स्वच्छता अभियान, सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०१९ जनजागृती स्वाक्षरी अभियान, साक्षरता रॅली अभियान व कोल्हापूर आणि सांगली येथे झालेल्या पूरग्रस्तांना दिलेले खाऊचे पैसे या सर्व कामांना अरूण डोंगरे यांनी वेळोवेळी मदत केली व प्रोत्साहन देऊन चिमुकल्यांचा सन्मान केला, असे प्राचार्या सुनंदा ऐडके यांनी सांगितले.