
कोरोना संकटाने मागच्या काही दिवसांपूर्वी हॉटेल, ढाबा बंद असल्याने हे व्यावसायिक अडचणीत आले होते. नुकतेच हॉटेल व ढाबे कोरोना संदर्भात शासनाने दिलेले नियम पाळत सुरू झाले आहेत. त्यामुळे मागची झालेली तुट भरून काढण्यासाठी या व्यवसायिकांना नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा कल पाहता तयारी सुरू केली आहे.
हिंगोली : नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई कोरोना संदर्भात शासनाच्या सूचना पाळत सज्ज झाली आहे. अनेकांचे बेत ठरले आहेत. या दिवसापुरता आनंद लुटण्यासाठी तरुणाई हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी आतुर झाले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनीही थर्टी फस्टचे वेगवेगळे मेनू तयार करण्याच्या नियोजनात व्यस्त झाल्याचे बघायला मिळत आहे.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
कोरोना संकटाने मागच्या काही दिवसांपूर्वी हॉटेल, ढाबा बंद असल्याने हे व्यावसायिक अडचणीत आले होते. नुकतेच हॉटेल व ढाबे कोरोना संदर्भात शासनाने दिलेले नियम पाळत सुरू झाले आहेत. त्यामुळे मागची झालेली तुट भरून काढण्यासाठी या व्यवसायिकांना नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा कल पाहता तयारी सुरू केली आहे. तरुणांत चायनीज डिशला सर्वाधिक पसंती राहणार असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी थर्टी फस्ट एन्जॉय करण्याची पध्दत तरुणाईंमध्ये रुजली आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व कुटुंब एकत्र येऊन तसेच अनेकजण मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र येऊन मनसोक्त गप्पा मारतात. रात्री बारा वाजता फटाके फोडून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते.
मराठवाड्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या दिवशी बाहेर मित्रांबरोबर जेवण करण्याचे बेत आत्तापासूनच ठरवले जात आहे. काही जणांनी धार्मिक स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. व्हेज, नॉनव्हेज व चायनीज डिशचा बेत अनेकांनी आखला आहे. शहरातील, शहराबाहेरील हॉटेल, ढाबाचालकांनी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यास सुरुवात केलेली आहे. शिवाय खास मेनू तयार करणारे वस्तादही दाखल झाले आहेत.
अशी असेल व्हेज डिश
पनीर भुर्जी, पनीर मसाला, पनीर टिक्का, पनीर अंगारा, पनीर हंडी, काजू पनीर, मिक्स व्हेज, कोल्हापुरी व्हेज, जयपुरी व्हेज, सिंगापुरी व्हेज, मखनवाला, व्हेज हंडी, व्हेज तवा, व्हेज खिम्मा, आलू मटर, आलू गोबी, बैंगन मसाला, मेथी मसाला, भेंडी मसाला, ग्रीनपिस मसाला, शेव भाजी, चणा भाजी, दालफ्राय, दाल तडका, जिरा दाल, बटर दाल, कोल्हापुरी दाल आदी प्रकारच्या भाज्यांसह सूप, डाळी यांचा समावेश आहे. ८० आणि १०० रुपयांना एक प्लेट उपलब्ध असल्याचे वृंदावन हॉटलच्या चालकांनी सांगितले.
बच्चेकंपनीसाठी विविध आईस्क्रिम
बच्चेकंपनीनेही या दिवशी आईस्क्रीम खाण्याचा बेत ठरवत असतात. त्यामुळे हॉटेलचालकांनी विविध प्रकारचे आईस्क्रिम ठेवण्याचेही नियोजन केले आहे. यामध्ये व्हेनिला, बटरस्कॉच, काजू - किसमिस, केशर पिस्ता, कोन, केशर रोस्टेड, कसाटा, चोकोबार, केशर कमला, टोमॅटो चॉकलेट आदीचा समावेश आहे . आईस्क्रीम ३० रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
अशी असेल नॉन व्हेज डिश
नॉनव्हेजमध्ये अंडा भुर्जी, अंडा आम्लेट, हाफकाय, अंडा करी, चिकन रोस्ट, विकत तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मोगलाई, चिकन जिम्मा, चिकन हंडी, चिकन ६५, चिकन बिर्याणी, चिकन मंचुरियन, मटन बियाणी, मेथी मटन, फिश करी, फिश गेस्टचा समावेश असून ७० ते २०० रुपयांपर्यंत ही डिश उपलब्ध असेल असे साई गार्डनचे मालक श्री. बांगर यांनी सांगितले.