

Double Murder in Hingoli
Esakal
विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतीच्या वादातून हिंगोलीत पुतण्याने काका आणि काकूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडालीय. पुतण्याने काका आणि काकूवर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात त्र्यंबक चोपडे आणि मंगलाबाई चोपडे यांचा मृत्यू झाला आहे..