esakal | परभणी जिल्ह्यावर ओल्या संकटाची छाया गडद, पावसामुळे मोठे नुकसान | Parbhani News
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी - जिल्ह्यात पावसाने मोठ्याप्रमाणावर पिकांचे नुकसान केले आहे.

परभणी जिल्ह्यावर ओल्या संकटाची छाया गडद, पावसामुळे मोठे नुकसान

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यात यंदा पावसाने कहर केला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जीवितहानी देखील झाल्याने जिल्ह्यावर ओल्या संकटाची छाया गडद होत चालली आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीनंतर आता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांसह (Farmer) बाधित व्यक्तींना मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे. परभणी जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यभरात ओळखला जाऊ लागला होता. जिल्ह्यात यंदा पावसाचे (Rain) आक्रमक रूप राहिले आहे. ता.११ व १२ जुलैला अतिवृष्टी, त्यानंतर ६ सप्टेंबरला पुन्हा अतिवृष्टी व परतीच्या पावसाऐवजी सप्टेंबर महिन्याच्या २७ व २८ रोजी झालेल्या संततधार पावसाने पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके वाढीच्या अवस्थेत व काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत असताना झालेल्या अतिवृष्टीने यंदाचा हंगाम शेतकर्‍यांच्या हातून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: पंकजा मुंडेंची अतिवृष्टीच्या मदतीवरुन धनंजय मुंडेंवर टीका, म्हणाल्या..

सोयाबीन बाजारपेठेत नेण्याऐवजी नदीच्या पुरात जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण शेत शिवारात पाणी झाले असून त्याचा निचराही होईनासा झाला आहे. अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता अडचणीत सापडली आहे. जुन ते सप्टेंबर दरम्यान शेती पिकांच्या नुकसानीची आकडेवारी लाखात गेली आहे. तब्बल ४ लाख ५२ हजार ८२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ३१६. ५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन व कापूस पिकांचा सर्वाधिक समावेश आहे. सार्वजनिक मालमत्तेसह महावितरणचे ही मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी देखील झाली आहे.

हेही वाचा: वाळूजजवळ ट्रॅव्हल बस-ट्रकचा भीषण अपघात, आठ प्रवासी जखमी

सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान

जिल्ह्यात दोन ते तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे ३ हजार १०६ किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यात छोट-छोटे ६६८ पुल वाहून गेले आहेत. ७६ शासकीय इमारतींना इजा पोहोचली आहे. जिल्हा परिषदेच्या ६३ शाळांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. ३७ तलाव, २९ कोल्हापुरी बंधारे फुटले आहेत. महावितरणच्या १५४ उच्चदाबाचे तर २१९ लघु दाबाचे पोल कोसळले आहेत. त्यामुळे १०.६८ किलोमीटर लांबीची उच्चदाब वाहिनी, तर १९.३९ किलोमीटरची लघूदाब वाहिनीला नुकसान पोहोचले आहे. ४९ रोहित्रात बिघाड झाली असून ९ रोहित्र खाली पडल्याची घटना ही घडली आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसामुळे सहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २७८ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.

नुकसान अपेक्षित निधी (लाखात)

---------------------------------------

शेतीपिक १६८०९.८२

सार्वजनिक मालमत्ता ८३,९२०.१७

जीवितहानी १२.६५ (प्राप्त निधी ४९.८८)

loading image
go to top