चिमण्या बाजारात कशासाठी गर्दी?

hingoli bazar
hingoli bazar

हिंगोली : शहरात मंगळवारा, अकोला बायपास, जिल्‍हा परिषद कार्यालयाच्या परिसरात आठवडे बाजार भरतो. परंतु, यातील जलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरला जाणाऱ्या बाजाराला विशेष महत्त्व आहे. हा बाजार चिमण्या बाजार म्हणून ओळखला जातो. या बाजारात योग्य किमतीत चांगल्या प्रतीच्या डाळी व धान्य मिळते. त्यामुळे येथे खरेदीला नागरिक पसंती देतात.

सुरवातीला हा बाजार मारवाडी गल्‍लीत भरत होता. आता जलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्‍त्यावर भरत आहे. शहरातील भाजीमंडईत नियमित भाजीपाला विकला जातो. तसेच धान्य व डाळीदेखील विक्रीस येतात. शहरात इतर ठिकाणीदेखील धान्य व डाळीची विक्री होते. परंतु, आठवड्याला भरणाऱ्या चिमण्या बाजारात प्रत्‍यक्ष शेतकऱ्यांचे धान्य मिळत असल्याने त्‍याला विशेष महत्‍व आहे. बाजारात गहू, ज्‍वारी, मूगडाळ, तूरडाळ, चणा, मसूर, उडीद डाळ, मटकी, चवळी, मेथ्या, तीळ, जवस, तांदूळ आदी धान्य स्वच्छ मिळते. शिवाय बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा कमी दराने व चांगल्या प्रतीचा माल येथे मिळतो. 

डाळींची होतेय विक्री

परिसरातील अंधारवाडी, बळसोंड, करवाडी, खांबाळा, खापरखेडा, इंचा, नवलगव्हाण, भांडेगाव, डिग्रस, पिंपरी, बोराळा, नांदुरा, जडगाव, पिंपरखेड, पांगरी आदी भागातील शेतकरी धान्य विक्रीसाठी आणतात. दर आठवडे बाजारात चार ते पाच क्‍विंटल डाळीची विक्री होत असल्याचे विक्रेते मोहन पवार यांनी सांगितले. ताजा भाजीपालादेखील विक्रीला येतो. दर मंगळवारी भरणाऱ्या चिमण्या बाजाराची नागरिक आवर्जून वाट पाहतात.

जनावरांचा बाजारही प्रसिद्ध

हिंगोली शहरात तीन ते चार ठिकाणी आठवडे बाजार भरतो. यामध्ये प्रत्येक आठवडे बाजाराचे वेगळे महत्त्व आहे. यासह दर मंगळवारी जनावरांचा बाजारही भरतो. परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा, जालना, लातूर आदी जिल्ह्यांतील पशुपालक जनावरांना विक्रीसाठी घेऊन येतात. जनावरांच्या आठवडे बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागातर्फे लाभार्थींना येथील बाजारातूनच जनावरे खरेदी करून दिले जातात.

चांगल्या प्रतीचे व गावरानी धान्य

दर आठवड्याला भरणाऱ्या चिमण्या बाजारात ग्रामीण भागातील धान्य विक्रीस येते. चांगल्या प्रतीचे व गावरानी असल्याने त्‍याची खरेदी केली जाते. भावदेखील कमी असतो. त्यामुळे दुसरीकडे डाळीची खरेदीच करीत नाही. या बाजारातच घरी लागणाऱ्या सर्वच दाळीची खरेदी करतो.
- बालाजी निगडकर, खरेदीदार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com