
सेनगाव पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सदर प्रकार पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांनी पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांना ही माहिती दिली आहे .
हिंगोली : जिल्हयातील सेनगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने गुरुवारी (ता .२०) पोलिस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करून ठाणे बंद करण्यात आले असून सेनगाव पोलिस ठाण्याचा कारभार नर्सी नामदेव पोलिस ठाण्यातून केला जाणार आहे .
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार सुरू केला आहे दररोज रुग्ण संख्या वाढत आहे कोरोना मुळे जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालयासह यासह पोलिस दलातही प्रवेश केला आहे . सेनगाव पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सदर प्रकार पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांनी पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांना ही माहिती दिली आहे . त्यानंतर संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत .
हेही वाचा - सासूला सोडवायला गेलेल्या सुनेचा सासऱ्याने केला खुन
तसेच पोलिस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करून कामकाज बंद करण्यात आले आहे . त्यानंतर आता सेनगाव पोलिस ठाण्याचा| कारभार नर्सी नामदेव पोलिस ठाण्यातून होणार आहे . सेनगाव पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यानी पालिस अधिक्षक योगेशकुमार यांना कळविला आहे . त्यानंतर संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत . या शिवाय पोलिस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करून कामकाज बंद करण्यात आले आहे . सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांतील गावकऱ्यांना तक्रारी व पोलिस ठाण्याच्या कामासाठी नर्सी नामदेव येथे यावे लागणार आहे . दहा दिवस सेनगाव पोलिस ठाण्याचे कामकाज राहण्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे