महिलांनी जागविल्या अंगभूत कला

file photo
file photo

परभणी : कोरोना ने अख्ख जग घरात बंदिस्त झालेले असतांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न सर्वांसमोर येतोच आहे. परंतु, परभणीतील ‘कुसुम बुटिक सिंगर’ व ‘लेक वाचवा लेक जागवा’ या व्हॉटस्ॲप समूहाने कोरोनाच्या भीतीवर सकारात्मकतेचा उतारा दिला आहे. दररोज नवनव्या विषयांवर महिला वर्गांना व्यक्त होण्यास भाग पाडले आहे.

कोरोना व्हायरसने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती व त्याची वाढती रुग्णसंख्या पोटात गोळा करणारी आहे. परिणामी प्रत्येक जण या विषाणूमुळे भयभीत झाला असून सर्वत्र संचारबंदी आहे. महिलांसह अबालवृद्ध घरात कोरोनामुळे अडकले आहेत. अशा बिकट परिस्थितीत परभणीतील व्हॉट्सॲप समूहाने महिला वर्गात सकारात्मकता व प्रोत्साहन मिळण्यासाठी नवी शक्कल लढवत टाईम मॕनेजमेंट साध्य केले आहे. मागील पंधरा दिवसांपासून या समूहावर एक एक भन्नाट विषय देत महिलांमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना फुंकर घातली आहे.
 
हेही वाचा - आता तत्काळ मदतीसाठी पथक


सदस्यांना बोलतं करतात
कुसुम बुटिक सिंगर या ग्रुपवर सदस्या निवेदिका प्रणिता देशपांडे या विषय देऊन सदस्यांना बोलतं करत आहेत. दररोज सकाळी नऊ वाजता विषय दिला जातो अन् त्यावर दुपारी तीन ते सहा हा वेळ व्यक्त होण्यासाठी असतो. माहेर, सिरियल शीर्षक गीते, आवडती स्त्री पात्र, श्रीदेवी का आवडत होती अन् तिच गाणं, १९६० च्या दशकपूर्वीची गाणी, प्रादेशिक संस्कृतीची जोपासना करणारी गाणी, देशभक्तीपर गाणी, लावणी, भारूड, गवळण, नाट्यगीते, अमिताभ, रेखा वर चित्रित गाणी असे वेगवेगळे विषय दिले जात असून त्यावर कमेंटरूपी व्यक्त होणाऱ्या महिलांचा सहभाग वाखाणण्या जोगा आहे. मनाची सुदृढता वाढावी वा कोरोनाची भीती नसावी, या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला भरीव प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या कलाविष्काराला दररोज तीन पुरस्कारही कुसुमच्या अॕडमिन संगीता क्षीरसागर यांनी देऊ केले आहे.  एका विशेष कार्यक्रमात हे बक्षीस वितरीत केले जाणार आहे.

वेळ कसा जातो कळतच नाही
सकाळी सगळे काम आटोपले की १२ वाजल्यापासून उत्सुकता असते. यामुळे खूप फायदा झाला. फावल्या वेळात हा उपक्रम निश्चित महिलांच्या मनोरंजनाचा भाग बनला आहे.
- छाया खंदारे - गायकवाड, शिक्षिका

 

सशक्त मने तयार झाली
कोरोनाला शारीरिक अन् मानसिक लढा दिला जातोय. मन फ्रेश असेल तर आपली प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल. महिला कोरोना प्रादुर्भावच्या चिंतेतून दूर जात आहेत आणि त्यामुळे हा उपक्रम निश्चित योग्य, प्रशंसनीय आहे.
- प्रणीता देशपांडे, संयोजक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com