परळी अर्बन बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांवर कारवाई कधी?

साखर कारखाना
साखर कारखानाई सकाळ

उस्मानाबाद : शंभु महादेव साखर कारखान्यातील (Sambhu Mahadev Sugar Mill) तारण असलेली साखर परस्पर विक्री केल्या प्रकरणात एक महिन्यापूर्वी बँकेच्या तत्कालिन अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या सगळ्यामध्ये बँकेचे अध्यक्ष अशोक जैन (Ashok Jain) यांची चौकशी सुद्धा पोलिसांनी केलेली नसल्याने संशय व्यक्त होत आहे. अशोक जैन यांनी नुकताच बँकेचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर कारवाई होणार यामुळेच त्यानी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत संशयित क्रमांक एक, तीन, चार अशा यांना अटक केली. मात्र संशयित क्रमांक दोन असलेले अशोक जैन यांच्याबाबत दया दाखविण्याचे कारण काय असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. परळी येथील वैद्यनाथ अर्बन बँकेकडे (Vaidyanath Urban Bank) तालुक्यातील (Osmanabad) हावरगाव येथील शंभु महादेव कारखान्याची साखर तारण असतानाही २७ कोटी ३७ लाख रुपयांची साखर परस्पर विकल्या प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट यांच्यासह आठ जणांवर कळंब पोलिस ठाण्यात १२ मार्च २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तालुक्यातील हावरगाव येथील शंभु महादेव शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज (Sambhu Mahadev Sugar And Allied Industries) या कारखान्याची स्थापना २००० मध्ये झाली असून कारखान्याचे (Osmanabad) अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट होते.

साखर कारखाना
Photo: CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आमनेसामने

शंभु महादेव कारखान्यासाठी दिलीपराव आपेट व कारखान्यांचे संचालक मंडळांनी या कारखान्यासाठी २००२ पासून २०१७ या कालावधीमध्ये वेळोवेळी तोडणी, वाहतूक, यंत्रणा उभारणीसाठी, शेतकऱ्यांना ऊसबील देण्यासाठी साखर कारखान्यात उत्पादित झालेल्या साखरेवर साखर तारण व कारखाना मॉरगेज करून ४६ कोटी २३ लाख रूपये कर्ज घेतले. अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन यांनी कारखान्याचे अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीर वैद्यनाथ अर्बन को-आप बँक मुख्य कार्यालय परळी या बँकेकडे तारण असलेला साखर साठा परस्पर विक्री केल्याची तक्रार आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. गोडाऊनमध्ये असलेला तारण साखर साठा एक लाख ५४ हजार १७७ पोते परस्पर विक्री करून २७ कोटी २३ लाख रूपयाचा अपहार केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. आपेट व अशोक जैन यांच्यावरच थेट आरोप असतानाही पोलिसांनी आपेट यांना अटक केली. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष श्री.जैन यांना सोडुन तत्कालिन अधिकाऱ्यांना देखील अटक केली आहे. मात्र अशोक जैन यांना चौकशीसाठी बोलावून सुध्दा ते आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. श्री.जैन यांना पोलिसाकडून अभय दिले जात असल्याचे संशय बळावू लागला आहे.

साखर कारखाना
सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाची तमा ना विद्यार्थ्यांची काळजी!

सर्वांवर कारवाई होईल

या प्रकरणात सर्व लोकांवर कारवाई होणार आहे. सध्या तपासाच्या अनुषंगाने काही लोकांना अटक केली आहे. त्यानुसार सर्वापर्यंत पोलिस पोहोचून योग्य ती कारवाई करणार आहेत. तपासाचा विषय असल्याने त्यावर अधिक बोलणे उचित नाही, असे पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com