कारण नसताना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकास उचलले

पोलिसांची संशयस्पद भुमिका मनोज गायके यांचा आरोप
aurangabad
aurangabad sakal

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पोलिसांनी आंदोलनाचा इशारा दिलेल्यांना गुरुवारी (ता.१६)रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र संत निरंकारी मंडळाच्या संत्सग भवनावर सेवा देणारे व आंदोलनाचा कुठलाही काहीच इशार न देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा बुलंद छावा मराठा युवा परिषदेचे प्रदेश संघटक मनोज गायके पाटील यांना हर्सुल पोलिसांनी कारण नसाताना आणि कुठलीही नोटीस न देता ताब्यात घेत रात्रभर बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांची भुमिका ही संशयस्पद असल्याचा आरोप मनोज गायके यांनी शुक्रवारी (ता.१७) केला आहे.

मनोज गायके म्हणाले की,मी संत निरंकारी मंडळाच्या सत्संग भवनवर निरंकारी सेवादल सदस्याच्या पोशाखात सेवा देत होतो. त्याच वेळी पोलिस माझ्याकडे आले. त्यांनी तुम्हाला पोलिस ठाण्यात यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी आम्ही कोणतेही प्रकारचे आंदोलन करणार नाही,त्या आंदोलकांशी माझा संबध नाही.

असे पोलिसांना सांगितले. ते ऐकल्यानंतर पोलिसांनी फक्त नोटीस द्यायची आहे, असे सांगून तुम्हाला हर्सुल पोलिस ठाण्यात यावेच लागेल असे सांगितले. त्यापुर्वी मी दवाखान्यात थायराईंडचा त्रास असल्याने जाऊन आलो होता. असे असतानाही कोणतीही नोटीस न देता मला हर्सुल पोलिस ठाण्यात घेऊन गेले, व रात्रभर ठेवले. सकाळी जा म्हणाले. एवढ्या वर्षापासून समाजसेवा करतो,यासह मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनातही शासकीय नुकसान न होऊ देता पोलिसांना सहकार्य करीत हे आंदोलन केले.

मुख्यमंत्री येणार असल्याने कोणतेही आंदोलन आम्ही करणार नव्हतो,तरीही विनाकारण त्रास देत आम्हाला पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे मराठा क्रांती मोर्चचे समन्वयक संतप्त झाले आहे. या विषयी पोलिस आयुक्ताकेड तक्रार करीत या विषयी न्यायालयात जात दाद मागणार असल्याचेही मनोज गायके यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com