महापालिका दररोज पाणी देणार कधी ?

अरविंद रेड्डी
रविवार, 4 डिसेंबर 2016

लातूर - धनेगावचे मांजरा धरण शंभर टक्के भरून वाहिले. साई व नागझरी बंधारे भरलेले आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बांधलेले जलकुंभ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ओसंडत आहेत. शहरभर फुटक्‍या जलवाहिन्यांतून पाणी गळत आहे. मात्र, नागरिकांना प्यायला पुरेसे पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे महापालिका नागरिकांना दररोज पाणी कधी देणार, असा प्रश्‍न आहे.

मांजरा धरणातील पाणी कमी झाल्याच्या कारणावरून गेली तीन वर्षे आठ ते 15 दिवसांनी पाणी मिळाले. यंदाच्या उन्हाळ्यात धरण कोरडे पडल्याने नळाद्वारे सहा महिने पाणीपुरवठा बंद राहिला. मिरजहून रेल्वेगाडीने पाणी आणून टॅंकरने वाटप करावे लागले.

त्यानंतर साई व नागझरी बंधाऱ्यात पाणी आल्याने पाणीपुरवठा सुरू झाला. मांजरा धरण व नदी भरून दुथडी वाहिली. त्यामुळे आठ दिवसांनी नळाला पाणी येऊ लागले. धरणात पाणी येऊन चार महिने झाले तरी अद्याप आठ दिवसांनीच पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेचे अभियंते वेळापत्रक बदलायचे म्हणून फायली घेऊन फिरत आहेत. मात्र, दररोज पाणी देणे शक्‍य झालेले नाही.

धरणावरील चार रोहित्रांतील साहित्य चोरीला गेल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात शिराढोण (ता. कळंब) पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन प्रशासन निवांत आहे. पोलिसांनी रोहित्र चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली नाही आणि प्रशासनाने रोहित्र बदलले नाहीत.

त्यामुळे मांजरा धरणातून अपेक्षित उपसा होत नाही. अजूनही नागरिकांना आठ दिवसांनी येणाऱ्या पाण्यावर समाधानी राहावे लागत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याकडे महापौर ऍड. दीपक सूळ व उपमहापौर चांदपाशा घावटी यांनी दुर्लक्ष केले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्त रमेश पवार व नगर अभियंता डी. जी. यादव फारसे गंभीर नाहीत. सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करून पालिकेत नेमके काय करतात? हाही प्रश्‍नही अनुत्तरितच आहे. यामुळे नागरिकांनी कोणाकडे अपेक्षा ठेवायच्या ? असा प्रश्न आहे.

Web Title: When will the daily municipal water?