शेकऱ्यांना ऊसाचा मोबदला मिळणार कधी ?

तानाजी जाधवर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

उस्मानाबाद - साखर कारखाने सूरु होऊन महिना ते दिड महिन्याचा कालावधी लोटला. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे त्याना देण्यात आलेले नाहीत. दराची कोंडी फोडली नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कोंडी कधी फुटणार व शेतकऱ्यांना पैसे मिळणार तरी केव्हा असा प्रश्‍न विचारला जात आहे.

उस्मानाबाद - साखर कारखाने सूरु होऊन महिना ते दिड महिन्याचा कालावधी लोटला. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे त्याना देण्यात आलेले नाहीत. दराची कोंडी फोडली नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कोंडी कधी फुटणार व शेतकऱ्यांना पैसे मिळणार तरी केव्हा असा प्रश्‍न विचारला जात आहे.

यंदा ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने लवकर कारखाने सूरु करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार आंदोलनानंतर दराची कोंडी फोडण्यात आली, पण जिल्ह्यामध्ये व मराठवाड्यामध्ये ऊसाच्या दर निश्चित झालेला नाही. एफआरपी नुसार देण्याचे कारखाने मान्य करीत असले तरी मागचे अनुभव पाहता ती रक्कम हातात पडेपर्यंत शेतकऱ्यांना विश्वास नाही. एका बाजुला मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसऱ्या बाजुला ऊसाच्या पिकाचाही मोबदला किती मिळणार याची अजुनही शेतकऱ्यांना कल्पना नाही. ऊसाचे गाळप होऊन आता महिना उलटला असुन तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत, कायद्यानुसार ऊस गाळपाला गेल्यापासुन पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. 

कारखान्याची एफआरपी निश्चित झाली असली तरी पहिला उचल कितीने काढायची यावर अजूनही कारखान्यानी निर्णय घेतलेला नाही. साहजिकच पैसे मिळण्यास विलंब लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील कारखान्याची दोन हजार दोनशे ते जवळपास अडीच हजार रुपयापर्यंत निव्वळ एफआरपी आहे. त्यामुळे एकावेळी तेवढे पैसे देणे शक्य नसल्याचे कारखानदाराकडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे या रक्कमेचे दोन हप्ते केले जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही दोन हप्ते करण्यात आले होते. सूरुवातीच्या महिन्यामध्ये दोन हजार दोनशे रुपये देण्यात आले मात्र त्यानंतर साखरेच्या दरात घसरण होऊ लागल्याने दोनशे ते तीनशे रुपयांनी रक्कम कमी करुन ती दुसऱ्या हप्त्याला देण्याचे ठरले होते. पण अनेक कारखान्यानी दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलाच नाही. त्यामुळे पहिली उचलच महत्वाची असुन त्यानंतरच्या रक्कमेची शाश्वती शेतकऱ्यांना नाही.

कोण फोडणीर कोंडी
दराची कोंडी फोडण्यासाठी कोणताही कारखाना पुढाकार घेताना दिसत नाही. एका कारखान्यानी ऊचल किती देणार हे निश्चित केले की, साहजिकच त्याचा इतर कारखान्यावर दबाव येतो. त्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन ही कोंडी फोडावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडुन व्यक्त होत आहे.

Web Title: When will the farmers get paid for sugarcane ?