समाजाचे नेतृत्व करताना राजकारण ठेवा बाजूला - अरविंद जगताप

सुषेन जाधव
मंगळवार, 12 जून 2018

औरंगाबाद : "समाजाचे नेतृत्व करताना राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. तरच समाजाचा उद्धार होत असतो. परंतु पाल जशी भिंतीवरील किडे खाऊन घरातील महापुरुषांच्या फोटोमागे लपते तसेच महापुरुषांच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजतात. तुम्ही मात्र तसे करू नका" , असा सल्ला पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क "यिन" समर युथ समिट २०१८ दरम्यान तरुणाईला दिला.

शहरातील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (ता. १२) ते बोलत होते. मोबाईलचा गैरवापर करणे, मुलींना छेडणे यासारख्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा त्याच मोबाईलचा चांगला वापर करून ज्ञान मिळवा, मुलींशी प्रेमाने वागा, मैत्री करा यातूनच आपण मानवी मूल्यांची जपावणूक करू शकू असे असेही श्री जगताप म्हणाले. 

सकाळ मुळे माझ्या गावात आले जिल्हाधिकारी

"सकाळ" सोशल फाऊंडेशन, रिलीफ फंड यामाध्यमातून बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी या माझ्या गावात जलसंधारणाची कामे झाली, त्यांनतर कधी गावात न येणारी मोठी व्यक्ती गावात येऊ लागली, जिल्हाधिकारी येऊ लागले. सकाळ मुळे हे गाव पाणीदार नकाशावर आल्याची भावना श्री जगताप यांनी व्यक्त केली.

Web Title: when you are representing society politics should keep aside said arvind jagtap