ते ठसे नेमके कोणत्‍या प्राण्याचे?

मंगेश शेवाळकर
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कळमनुरी (जिल्हा हिंंगोली) :  तालुक्यातील पाळोदी शिवारात मृत हरिणाच्या बाजूला वन्य प्राण्यांचे ठसे आढळून आल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी बुधवारी (ता.6) लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये कुठल्याही प्राणी आढळून आला नाही. त्यामुळे घटनास्थळावर आढळून आलेले ते ठसे नेमके कोणत्‍या प्राण्याचे आहेत याबाबत गुढ कायम राहिले आहे.

पाळोदी शिवारात ॲड गजानन बेद्रे यांच्या शेताच्या बांधावर बुधवारी (ता.6) मृतावस्थेत झालेले हरण आढळून आले होते. या हरिणाच्या शरीराचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्ल्याचे आढळून येत घटनास्थळी वन्य प्राण्यांच्या पायांचे ठसे आढळून आल्यामुळे परिसरात बिबट्या किंवा तडस प्राण्यांचा वावर वाढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकारामुळे शेतीमधील आखाड्यावर वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेत गड्या मधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल एन.टी. तोलसलवार, वनरक्षक एस.एस. क्षीरसागर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वन्यप्राण्यांच्या ठशाची पाहणी केली. त्यानंतर मृत हरणाला जागेवरच ठेवून हरिणाची शिकार केलेल्या प्राण्याचा शोध घेण्याकरिता या ठिकाणावर वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला.

गुरुवारी (ता.7) वनविभागाने ट्रॅप कॅमेरा ताब्यात घेत मृत हरणाचे शवविच्छेदन करून त्याची विल्हेवाट लावली व लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याची तपासणी केली. या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये रात्रभरात कोणताही प्राणी आढळून आला नसल्‍याचे वनरक्षक श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे पाळोदी परिसरात हरीण मृत्यूप्रकरणी घटनास्थळी आढळून आलेल्या ठसे नेमके कुठल्या प्राण्यांचे आहेत याबाबत गुढ कायम राहिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which animal exactly does that impression?