cotton loss by heavy rain
sakal
अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. खरीप हंगाम नैसर्गीक आपत्तीचे संकट ओढवल्याने कपाशी, तूर, सोयाबीन,मुग, उडीद, मका, बाजरी पिकांची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. केलेला खर्च हि वसूल होत नाही.सोयाबीन पुर्ण पाण्यात गेले आहे. तर कपाशीची बोंड सडली आहे. तुरीचे पिकं उबळले आहे.