फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे लोकसभेला गेल्यास विधानसभेसाठी कोण?

नवनाथ इधाटे
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

फुलंब्री : फुलंब्री विधानसभेसाठी मतदार संघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरु झाली असून ग्राउंड पातळीवर आपापल्या गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली जात आहे. फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे भाजपकडून औरंगाबाद लोकसभा लढण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

फुलंब्री : फुलंब्री विधानसभेसाठी मतदार संघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरु झाली असून ग्राउंड पातळीवर आपापल्या गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली जात आहे. फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे भाजपकडून औरंगाबाद लोकसभा लढण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

बागडे यांनी जर औरंगाबाद लोकसभा लढविली तर फुलंब्रीत विधानसभेसाठी कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार यांची उत्सुकता फुलंब्रीकरांना लागली आहे. विधानसभा निवडणूक वर्षभरावर राहिली असल्याने आतापासूनच भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी मतदार संघात चाचपणी सुरु केली आहे. त्यामध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपच्या महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्षा अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री मतदार संघ पिंजून काढणे सुरु केले आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेचे उपमहापौर विजय औताडे यांनीही आगळेवेगळे कार्यक्रम घेऊन पक्षामध्ये आपले स्थान मजबूत करण्याचे काम सुरु केले आहे. माजी आरोग्य मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर यांचे चिरंजीव डॉ. गिरीश गाडेकर हे देखील फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुक आहे. एवढे असले तरी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे लोकसभेपेक्षा विधानसभाच लढण्यासाठी इच्छुक आहेत.

मात्र पक्षाने जर त्यांना औरंगाबाद लोकसभा दिली तर बागडे लोकसभा सुद्धा लढवू शकतात. कारण विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण औरंगाबाद जिल्हा त्यांनी वेळोवेळी पिंजून काढला आहे. त्यामुळे हरिभाऊ बागडे लोकसभेसाठी जाणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु असल्यामुळे फुलंब्रीत विधानसभेसाठी भाजपचा दावेदार कोण असेल याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुराधा चव्हाण यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी चव्हाण यांना 34 हजार मतदान पडल्याने तिसऱ्या क्रमांकावर चव्हाण यांना समाधान मानावे लागले होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीत गटतट निर्माण झाल्याने वर्षभरातच चव्हाण यांनी आपल्या समर्थकासह भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणुक भाजपच्या तिकिटावर लढवून जिल्ह्यात सर्वात जास्त फरकाने चव्हाण विजयी झाल्या होत्या. त्यानंतर चव्हाण यांनी आपली पकड फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यात मजबूत बनवली आहे. गणेश उत्सव काळात गावागावत गाठीभेटीवर भर दिला असल्याने पायाला भिंगरी बांधून चव्हाण मतदार संघात विविध कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. 

तर दुसरीकडे महानगरपालिकेचे उपमहापौर विजय औताडे यांनी देखील मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली पकड मजबूत करण्याचे काम केले आहे. विजय औताडे यापूर्वी राष्ट्रवादी पक्षात काम करीत होते. 2014 लोकसभेत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात औताडे यांनी प्रचार केला होता. मात्र लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विजय औताडे यांनी भाजपात प्रवेश करून मनपाचे आरोग्य सभापती, उपमहापौर, भाजयु मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष पद मिळवून पक्षात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे विधानसभेचे डोहाळे विजय औताडे यांना देखील लागू लागले आहे. माजी आरोग्य मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर यांचे चिरंजीव डॉ. गिरीश गाडेकर यांनीही फुलंब्री विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहे. त्यामुळे भाजपात फुलंब्री विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी होत आहे. 

बागडेंचे झुकते माप कोणाकडे..?

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने भाजपात इच्छुकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. परतू बागडे लोकसभेसाठी जरी गेले तरी त्यांच्या शब्दावरच भाजपचे तिकीट फुलंब्री मतदार संघात फायनल होणार असल्याने इच्छुकांनी विविध कार्यक्रमात बागडे यांना बोलावून त्यांच्या उपस्थिती विविध कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे शेवटी बागडे कोणाला झुकते देईल याची उत्सुकता फुलंब्रीकरांना लागली आहे.

Web Title: Who is the Legislative Assembly after the Haribhau Bagade assembly elections?