Maratha Reservation Survey : सर्वेक्षण राहिलेल्यांनी पालिकेशी संपर्क साधावा

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या गटातील कुटुंबांची पाहणी केली जात आहे. प्रगणकांकडून शहरातील सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वाकडे आहे. कोणाचे सर्वेक्षण राहिले असल्यास त्यांनी नगर पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले.
beed
beed sakal

बीड : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या गटातील कुटुंबांची पाहणी केली जात आहे. प्रगणकांकडून शहरातील सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वाकडे आहे. कोणाचे सर्वेक्षण राहिले असल्यास त्यांनी नगर पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले.

गेल्या महिन्यात ता. २३ जानेवारीपासून शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. सुरवातीचे दोन दिवस तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणाचे काम मंदगतीने सुरु होते. नंतर प्रगणकांनी झोकून देऊन काम केल्याचे मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी नीता अंधारे, सम्राट कदम यांनी सांगितले.

beed
Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्र वितरणाला स्थगिती द्या ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांची निदर्शने

शहरात सर्वेक्षणासाठी १३ समन्वयक, २६ पर्यवेक्षक आणि ५०८ प्रगणक कार्यरत आहेत. (आज) शुक्रवारी (ता. दोन) सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस आहे. कोणाचे सर्वेक्षण राहीले असेल, अशा कुटुंबांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन नीता अंधारे यांनी केले. या कामासाठी अमोल बडगुजर, चंद्रकांत काळे, श्री. तिडके यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com