esakal | का सुरु आहे ‘हत्ती’च्या पावलांनी रोग निर्मुलनाकडे वाटचाल?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड जिल्हा हत्तीरोग निर्मुलनात पाचव्या स्थानी, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या
जानेवारी ते डिसेंबर 2019 अखेरपर्यंत 68 हजार 527 रक्तजल नमुने तपासणी, यात 69 रुग्णांना हत्ती रोग असल्याचे निदान तर, 805 अंडवर्धी रुग्णांपैकी 402 जणांची शस्त्रक्रीया
नांदेड जिल्ह्यातील पेठवडज आणि जलधारा येथे दोन रात्र चिकित्सालयाची स्थापना; 36 हजार 207 संशयितांमध्ये 14 रुग्णांना हत्ती रोग असल्याचे निष्पन्न
जिल्ह्यात एकुण 83 जणास हत्ती रोगाची लागण
2020 पर्यंत ‘हत्ती’रोग निर्मुलनाचे स्वप्न भंगणार; आरोग्य विभागाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का?

का सुरु आहे ‘हत्ती’च्या पावलांनी रोग निर्मुलनाकडे वाटचाल?

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : हत्तीरोग आजार सन 2020 पर्यंत हद्दपार करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने ध्येय निश्चित केले होते. या आजाराबद्दल असलेले लोकांमधील गैरसमज आणि सातत्यपूर्ण औषधोपचारातुन या आजारावर मात करणे शक्य आहे. परंतु आजही जिल्ह्यातीलच नव्हे तर, महापालीकेच्या हद्दीत अनेक ‘हत्ती’रोग रुग्ण अढळुन येत आहेत. त्यामुळे ‘हत्ती’च्या पावलांनी रोग निर्मुलनाकडे सुरु असलेल्या वाटचालीमुळे 2020 मध्ये हत्ती रोग निर्मुलनाचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का? हा प्रश्न कायम आहे.

ज्या भागात भात शेती मोठ्या प्रमाणावर होते त्या ठिकाणी ‘क्युलेक्स’ डासांची उत्पत्ती अधिक होते. नांदेड जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, भोकर, नायगाव, उमरी आणि कुंडलवाडी यासह जिल्ह्यातील इतर ठिकणी वर्षाला 600 पेक्षा अधिक जनतेला हत्ती रोगाची लागण होते असल्याचे आरोग्य विभागाच्या अकडेवारीवरुन स्पस्ट होते. परंतु, सद्यस्थितीत हे प्रमाण उपपथक शुन्य दशांऊश दहा तर व रात्रचिकित्सालयांतर्गत शुन्य दशांऊश शुन्य सात इतके आहे.

हेही वाचा- अबब...! १४ लाखाचे दागिणे जप्त

निर्मुलनासाठी स्वतंत्र यंत्रणा...पण -
हत्तीरोग निर्मुलनासाठी जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध असली तरी, सध्या विभागात 135 पदे मंजुर असताना त्यातील केवळ 97 पदेच भरली गेली आहेत. अजून 38 पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य अधिकारी व डॉक्टर व कर्मचारी यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी काम कराता यावे यासाठी आठ उपपथक स्थापन करण्यात आली आहेत. हे पथक भोकर, उमरी, बिलोली, नायगाव, कुडुंलवाडी यासह गाव स्तरावरील व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेण्यासाठी कार्य करतात. रक्तजल नमुण्यांची जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेतील वैज्ञानिकांमार्फत तपासणी करुन हत्तीरोग किंवा लक्षणे अढळुन अल्यास त्या रुग्णास (डीईसी) हा 12 दिवसाच्या गोळ्यांचा कोर्स दिला जातो. त्यामुळे काही वर्षापासून हा आजार आटोक्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचलेच पाहिजे- विद्यार्थ्यांना का हवा ‘शिवभोजना’चा आधार


हत्ती रोग उच्चाटणाच्या संबंधित विभागाला सुचना-

पोलीओ आजाराप्रमाणे हत्ती रोग निर्मुलनासाठी आरोग्य विभागाने पाऊल उचलले असून, त्यासाठी 2020 पर्यंत या रोगाचे समुळ उच्चाटण करण्याच्या संबंधित विभागाला सुचना दिल्या आहेत. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर हत्तीरोगाचे निर्मूलन करण्यात अधिकारी व कर्मचारी यांना कितपत यश येते हे येणारा काळच ठरवेल. 

loading image