प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन पद्धतीची ‘यांनी’ केली मागणी...कशी ते वाचा...

प्रा. डॉ. किरण शिल्लेवार
प्रा. डॉ. किरण शिल्लेवार

नांदेड - कोरोना रुग्णांच्या बाबत ‘प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन’ पद्धतीचा वापर करण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि डॉ. किरण शिल्लेवार यांनी केली असून त्या संदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्याची दखल घेतली असून या बाबत शासनाच्या आरोग्य विभागाला हे निवेदन पाठवले आहे. 

नांदेडच्या सायन्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. किरण शिल्लेवार यांनी प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन पद्धतीचा वापर करण्याचे निवेदन इ - मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. प्रा. डॉ. शिल्लेवार यांनी प्रा. डॉ. दिप्ती तोटावर आणि प्रविण डांगे यांच्यासोबत या संदर्भातील मांडणी केली आहे व तसा सविस्तर प्रस्तावही पाठवला आहे. 

असे आहे ‘प्लाझ्मा’चे काम...
या थेरॉटिकल विषयाला ‘प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन’ असे नाव दिले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णामध्ये त्यांच्या प्लाझ्मामध्ये अटीबॉडीज असतात. जे कोरोनाला हरवून आलेले असतात किंवा कोरोना विषाणूशी लढा देऊ शकतात. बरे झालेल्या रुग्णामधून आपण चारशे मिली रक्त संकलन करुन त्या रक्तास सेंट्रीफ्युज दीड हजार ते दोन हजार आरपीएमवर रोटेट करुन दहा ते पंधरा मिनिट ठेवावे. त्यामुळे रक्ताचे तीन स्तर तयार होतात. त्यातील सर्वात वरचा स्तर हा प्लाझ्मा असतो. त्या प्लाझ्मामध्ये अटीबॉयोटिक असतात आणि आपणास जवळपास १२० ते १४० मिली प्लाझ्मा मिळतो. हा प्लाझ्मा उणे ४० ते उणे ८० मध्ये ठेवावा लागतो. 

रुग्ण बरा होण्यास मोठी मदत
ज्या व्यक्तीचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशा व्यक्तींना हा काढलेला प्लाझ्मा अत्यंत उपयोगी पडतो. हा काढलेला प्लाझ्मा आपणास रुग्णाच्या शरीरात दिल्यानंतर तो रुग्ण बरा होण्यास मोठी मदत मिळते. परंतू यासाठी दोन्हीही रुग्णांचा ब्लड ग्रुप हा एक असणे आवश्‍यक आहे. ज्याच्याकडून आपण प्लाझ्मा घेतलेला आहे व ज्या रुग्णास आपण हा प्लाझ्मा दिलेला आहे, अशा व्यक्तींना प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबू, संत्री, आवळा आदी फळांचा ज्युस देणे आवश्‍यक आहे.  

अती, मध्य गंभीर रुग्णास होऊ शकते मदत
आणखी एक वेगळी पद्धत म्हणजे अपरायझेस (Aphaeresis) किटच्या माध्यमातून कोरोना रुग्णास ताबडतोप प्लाझ्मा देता येईल. जो कोरोना रुग्ण बरा झालेला आहे. या किटच्या माध्यमातून त्याच्या रक्तातून पाचशे ते सहाशे मिली प्लाझ्मा काढणे आणि त्या व्यक्तीचे वजन ६० ते ६५ किलो असणे आवश्‍यक आहे. या कीटच्या माध्यमातून काढलेला प्लाझ्मा हा कोरोना बाधित रुग्णास ताबडतोप देता येतो. जे रुग्ण अतिगंभीर व मध्य गंभीर आहेत, अशांना याचा वापर करता येऊ शकतो. या अपरायझेस (Aphaeresis) किटची मूळ किंमत साडेसात ते नऊ हजाराच्या दरम्यान आहे. वरील बाबींसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल आफ इंडिया (डीसीजीआय) यांची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचेही प्रा. डॉ. किरण शिल्लेवार यांनी सांगितले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com