
लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अचानकपणे जूनपासून हप्ता मिळाला नाही. त्यामुळे त्या महिला बँका, पोस्ट ऑफिसमध्ये चकरा मारून विचारणा करीत आहेत. मात्र, पैसे न आल्याचे नेमके कारण कुणीच सांगत नसल्यामुळे या महिला प्रचंड संभ्रमात असून विचारणा कुठे करावी, याचीही माहिती मिळायला तयार नाही. त्यामुळे या महिलांची दिवसेंदिवस घालमेल वाढत आहे. याकरिता स्थानिक पातळीवर महिलांना पात्र की अपात्र याची माहिती मिळाली तर या महिलांचा संभ्रम निश्चितच दूर होईल. मात्र, याकरिता शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.