‘लालपरी’ का होते भिकारी..?

file photo
file photo

नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दिवसेंदिवस आर्थिक डबघाईस येत असून शिवशाहीचा तोटा, भंगार अवस्थेकडे झुकलेल्या लालपरीचे नुतनीकरण, स्वच्छतेवर होणारा कोट्यवधींचा खर्च आणि खड्डेमय रस्त्यांवरून धावताना लालपरीची होणारी दुरवस्था, अशा अनेक कारणांमुळे लालपरी अडचणीत सापडली असून, डबघाईस आली आहे.


सध्या नांदेड विभागाकडे ५९३ बस आहेत. यातील सव्वाशे बस नांदेड आगाराकडे आहेत. परंतु, त्यातील अनेक बस या भंगार झाल्याने दोन महिन्यांपूर्वी विभागातील भंगार बसेसला मलमपट्टी करून नवे स्वरूप देण्यासाठी विभागाने जवळपास २० बसेस औरंगाबाद येथील वर्कशॉपमध्ये पाठविल्या होत्या. टप्प्याटप्प्याने अजून काही भंगार गाड्या नुतनीकरणासाठी पाठविल्या जाणार आहेत. परंतु, दुसऱ्या गाड्या औरंगाबादला पाठविण्यापूर्वीच अगोदरच्या ढाचा बदललेल्या अनेक बसेसची अवस्था पुन्हा खिळखिळी झाल्याचे दिसून येते.

आसन व्यवस्थादेखील खिळखिळी ​


महामंडळाने नवे मॉडेल तयार केलेल्या बसला ट्रकचा ढाचा बसविला असल्याने या बस दिसायला लक्झरीप्रमाणे भारदस्त आणि मोठ्या आकाराच्या दिसत आहेत. परंतु, या बसला थोडेजरी खरचटले तरी त्याचा पत्रा गळून पडतो. आणि बस विद्रूप दिसू लागतात. शिवाय या गाड्यांमधील आसन व्यवस्थादेखील खिळखिळी झाल्याने त्याच्या प्रतिक्रियादेखील प्रवाशांकडून ऐकायला मिळत आहेत.


राज्य परिवहन विभागाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज
 
एसटी महामंडळाच्या बहुतेक बस भंगार असतानादेखील त्यांची देखभाल दुरुस्ती न करताच त्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत सोडल्या जात असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन विभागदेखील त्याकडे गंभीरतेने लक्ष घालत नाही.
नांदेड विभागाकडे ५९३ बस चालविण्यासाठी केवळ एक हजार दोनशे चालक, तर एक हजार २११ वाहक आहेत. ईटीआयएम मशीनदेखील मोजक्याच आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान, ऐनवेळी ईटीआयएम मशीन बंद पडल्यास प्रवाशांना या बसमधून उतरून दुसऱ्या बसमध्ये प्रवास करावा लागतो.

शिवशाही का जाते तोट्यात

लालपरीला पर्याय म्हणून एसटी महामंडळाने शिवशाही बस सुरू केली. परंतु, त्या सर्व बसेसवर खासगी चालक आणि महामंडळाचा वाहक अशी नेमणूक करुन एसटी महामंडळाने एखा आर्थाने बसचे खासगीकरणाचा घाटच घातला आहे. त्यामुळे शिवशाही नफ्या ऐवजी घाट्यात सुरू आहे. नांदेड विभागात ३३ शिवशाही सुरू असल्याचे सांगितले जाते मात्र त्यातुन नेमके किती उत्पनान होते या बद्दल काच्यता केली जात नाही. तर एकंदरीत महामंडळाचे उत्पन्नात शिवशाहीचे उत्पन्न दाखविले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com