प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत विधवेला बेदम मारहाण

दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधास महिलेच्या सासरच्या लोकांकडून विरोध केला जात होता
crime news in beed
crime news in beedcrime news in beed

केज (बीड): प्रियकरासोबत पळून गेलेली तेवीस वर्षीय विधवा महिला गावी परत आल्यानंतर तिला तिच्या प्रियकराच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल कर म्हणून बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी (ता.२४) घडली. याप्रकरणी चौघा जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील तेवीस वर्षीय विधवा महिलेचे साळेगाव येथील एकासोबत प्रेम संबंध जुळले होते. या प्रेमाच्या संबंधामुळे ती प्रियकरासोबत पळून गेली होती.

मात्र ते दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधास महिलेच्या सासरच्या लोकांकडून विरोध केला जात होता. काही दिवसानंतर ते दोघे परत गावी आल्याने महिलेचे सासरा-सासू व दीर-जाऊ यांनी त्यांच्या प्रेम संबंधास विरोध दर्शवत शनिवारी बळजबरीने त्या विधवा महिलेला घरी बोलावून घेतले. यावेळी तुझ्या प्रियकराच्या विरोधात पळवून नेऊन अत्याचार केल्याची पोलिसात खोटी तक्रार कर, अन्यथा तुला जिवंत सोडणार नाहीत, असे म्हणून चौघांनी तिला मारहाण करून जखमी केले.

crime news in beed
ट्रॅफीक जॅम दूर करण्यासाठी पालकमंत्री लक्ष देतील का?

सोमवारी (ता.२६) पोलिसात याबाबत पीडित महिलेने तक्रार दिली. यावरून पद्मिन बंकट काळे (सासू), बंकट दिगांबर काळे (सासरे), सुरेश दंकट काळे (दीर) व सोनी सुरेश काळे जाऊ (सर्व रा. बजरंगनगर, केज) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महादेव गुजर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com