पतीच्या ‘या’ कृत्याने पत्नीची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

शहराच्या बऱ्ह्यामसिंगनगर भागात मंगळवारी (ता. १४) जानेवारी रोजी घडली.

नांदेड : पतीच्या अनैतीक संबंधाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहराच्या बऱ्ह्यामसिंगनगर भागात मंगळवारी (ता. १४) जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी पतीसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड शहराच्या बऱ्ह्यामसिंगनगर भागात दिपाली भगवान ठिगळे आपल्या कुटुंबियासह किरायाच्या घरात राहत होत्या. मात्र सुखी संसार सुरू असतांना भगवान ठिगळे याचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतीक संबंध आले. ही बाब त्याची पत्नी दिपाली (वय २४) हिला समजली. यानंतर त्याला तिने अनेकवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. हा प्रकार तिने आपल्या माहेरीही कळविले होते. मुळ गाव सोडून पोट भरणय्साठी हे कुटुंब नांदेडात मागील काही दिवसांपासून राहत होते. पतीच्या अनैतीक संबंधास ती वेळोवेळी अडथळा निर्माण करीत असल्याने तो तिचा मानसिक व शारिरीक छळ करीत होता. 

हेही वाचाएंन्जेडर हेल्थकडून ‘कर्मा’चा गौरव

पंख्याला घेतला गळफास

या सततच्या त्रासाला कंटाळून तिने मंगळवारी बऱ्ह्यामसिंगनगरातील आपल्या किरायाच्या घरात ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती तिच्या माहेरी समजताच नातेवाईकांनी नांदेडकडे धाव घेतली. यावेळी तिचा पती घरी नव्हता. अशोक नारायण जावळे (वय ५२) रा. शुक्रवारपेठ, वसमत (जिल्हा हिंगोली) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती भगवान राजकुमार ठिगळे (वय २७) आणि एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जाधव करीत आहेत. 

लाचखोर पोलिस निलंबीत 

नांदेड : लाचेची मागणी करण्याच्या आरोपात गुन्हा दाखल झालेला नांदेड ग्रामीणचा पोलीस शिपाई नामदेव ढगे हा जामीनावर सुटला. मात्र त्याला बुधवारी (ता. १५) पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

ता. १२ जानेवारी रोजी परभणीच्या शेख आरेफ शेख साबेर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नामदेव नागोराव ढगे (बकल नं.२८७४) हे त्यांचे चार टिप्पर गिट्टीव मुरूमाची वाहतूक करतात. त्यासाठी प्रत्येक टिपरचे तीन हजार असे १२ हजार रुपये लाच मागत आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ता. १२ जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली. तेंव्हा तडजोड करुन चार हजार रुपये स्विकारण्यासाठी नामदेव ढगेने प्रयत्न केले हे निष्पन्न झाले. 

येथे क्लिक कराशेतकरी कुटुंबातील शिवनंदा बनली उपनिरीक्षक

गुन्हा दाखल होताच निलंबनाची कारवाई

यावरून एसीबीचे पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ता. १३ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात नागदेव ढगेविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्यादिवशी नामदेव ढगे ला अटक केली. मंगळवारी (ता. १४) रोजी न्यायालयात हजर केले. मात्र न्यायालयाने त्याला जामीन दिला. बुधवारी (ता. १५) जानेेवारी रोजी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नामदेव ढगेला निलंबित केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wife commits suicide by her husband