पत्नीचा विष पाजून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

अडीच एकरांसाठी पतीने पत्नीला विष पाजून मारल्याची घटना कासारी (बो.) येथे बुधवारी (ता. दहा) घडली. घडली. विष पाजल्यानंतर उपचारादरम्यान गुरुवारी (ता. ११) अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात संबंधित महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या भावाने दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

किल्लेधारूर - अडीच एकरांसाठी पतीने पत्नीला विष पाजून मारल्याची घटना कासारी (बो.) येथे बुधवारी (ता. दहा) घडली. घडली. विष पाजल्यानंतर उपचारादरम्यान गुरुवारी (ता. ११) अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात संबंधित महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या भावाने दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

तालुक्‍यातील कासारी (बो.) येथील बालासाहेब व्यंकटी बडे आणि त्याची पत्नी राहीबाई अनेक दिवसांपासून सतत भांडणे होत होती. त्यातच बालासाहेब याची अडीच एकर शेतजमीन पत्नी राहीबाई हिच्या नावावर आहे. सदर जमीन आपल्या नावावर करावी म्हणून बालासाहेबाने पत्नीकडे तगादा लावला होता. जमिनीच्या कारणावरून पती-पत्नीत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

त्यातून राहीबाई या माहेरी भोगलवाडी येथे भावाकडे राहत व अधूनमधून सासरी कासारी येथे जात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. राहीबाई बुधवारी कासारी येथे आल्यावर पती-पत्नीत जमिनीच्या कारणावरून भांडण झाले. यात बालासाहेबने राहीबाईस बुधवारी दुपारी विषारी औषध पाजले. नंतर राहीबाईला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना राहीबाईचे निधन झाले. याप्रकरणी राहीबाईचा भाऊ बिभीषण तिडके यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात पती बालासाहेब, दीर शाहू व्यंकटी बडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Murder by Husband Poison Crime