कुर्‍हाडीने घाव घालून पतीने केला पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नांदेड - एका विवाहितेवर कुर्‍हाडीने घाव घालून तिचा खुन केल्याची घटना २८ मे रोजी लोहा तालुक्यातील वडेपुरी तांडा येथे सायंकाळी घडली. पती पत्निच्या वादाचे रुपांतर वादात झाले. याच कारणावरुन पतीनेच हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज सोनखेड पोलिसांनी वर्तविला आहे. 

लोहा तालुक्यातील वडेपुरी तांडा येथील विवाहीता सुनिता बालाजी जाधव (३२) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुनिता यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सुनिता व तिचा पती बालाजी या दोघांमध्ये वाद झाल्याने सुनिता माहरी वडगाव तांडा येथे गेली होती. दरम्यान, माहेरच्या मंडळीनी तिची समजुत काढून सासरी आणुन सोडले. परंतु, मनात राग कायम असलेल्या पती बालाजी सुनिताला गावाबाहेर घऊन गेला, त्यानंतर त्याने कुर्‍हाडीने घाव घालून तिचा खुन केला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोनखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सुनिता यांचा पती फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: wife murdered by husband

टॅग्स