पतीने घोटला पत्नीचा गळा, नंतर केले असे...

योगेश पायघन
शनिवार, 20 जुलै 2019

पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात आनंदने पत्नी ममताचा गळा दाबून खून केला.

औरंगाबाद - पती-पत्नी संसाराच्या गाड्याचे दोन चाक. त्यातील एक चाक जरी डळमळले तरी दुसऱयाने संभाळून घेणे गरजेचे आहे. तरच नाते टिकते. पण, वाळूज परिसरातील रांजणगावमधील पवननगर एका पती-पत्नीमध्ये सतत घरगुती वादातून खटके उटत होते. वाद इतका विकोपाला गेला की, पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात जात गुन्हाची कबुली दिली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता आनंद लोखंडे असे मृताचे नाव आहे. ममता तिचा पती आनंद, मुलगा संघर्ष व मुलगी रमा यांच्यासह औरंगाबादमधील मुकुंदवाडी भागात राहत होते, तर ममताचे सासू सासरे पवननगरात राहात होते.

तीन दिवसांपूर्वी आनंद आपल्या पत्नी व मुलांसह वडील सुरेश त्याच्याकडे पवननगर येथे राहण्यासाठी आला होता. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात आनंदने पत्नी ममताचा गळा दाबून खून केला. आनंदला ताब्यात घेतल्याचे वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's murder at Rangangaon District Aurangabad