वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

फुलंब्री - उन्हाचा पारा वाढल्याने जिवाची लाहीलाही होत आहे. त्यापासून बचाव व्हावा यासाठी सावलीचे ठिकाण,  थंडगार पाणी, टोपी आदींचा वापर करताना नागरिक दिसत आहेत परंतु ऊन, वारा व पावसाची भीती न बाळगता वास्तव्य करत असलेल्या वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याने जलस्रोतही कोरडे पडले आहेत. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या भागातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. 

डोंगराळ भागातून वन्यप्राणी गाव वस्तीवर येऊन पिण्याच्या पाण्याचा शोध घेत आहेत. मात्र ग्रामीण भागातही खेडेगाव व शेतवस्तीवरील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदी, नाले व सिंचन विहिरी कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्‍याची तहान टॅंकरवर भागविली जात आहे. उन्हाच्या कडाक्‍याने पानझड झालेल्या वृक्षांखाली सावलीच नसल्याने प्राण्याच्या विश्रांतीचा आश्रयही आता नष्ट झाला आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असल्याने पाण्याच्या शोधात तहानलेल्या वानर सेनेने जंगल सोडून शहराकडे येण्यास सुरवात केली आहे. वानरांच्या एका टोळीने आपला मोर्चा आता थेट गाववस्तीकडे वळविला आहे. तालुक्‍यात वानरांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात असून दिवसभरात अन्नपाण्याचा शोध घेत फिरणारी वानरसेना फुलंब्रीत अनेक ठिकाणी घराभोवती फिरून तहान भागवीत आहे. तालुक्‍यात डोंगराळ भाग असल्यामुळे तसेच दाट जंगल असल्याने या भागात वानरे मोठ्या संख्येने टोळ्या करून राहतात.  डोंगराळ भागात वन्य प्राण्यांसाठी वन विभागाने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: wild animal water