रानडुकराच्या दहशतीमुळे टेंभूर्णीत गावकरी छतावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

वसमत (जि. हिंगोली) - टेंभूर्णी (ता. वसमत) गावात शिरलेल्या रानडुकराने बुधवारी सकाळी धुमाकूळ घातला. त्याने चावा घेतल्यामुळे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रानडुकराच्या दहशतीमुळे अनेक ग्रामस्थांना सुमारे तासभर घराच्या छताचा आसरा घ्यावा लागला.

टेंभूर्णीत मंगळवारी (ता. 19) मध्यरात्रीच्या सुमारास रानडुकराने शेतातील घरांच्या (आखाडा) शेजारी बांधलेल्या जनावरांना चावा घेऊन जखमी केले. याशिवाय परिसरातील आणखी काही जनावरे किरकोळ जखमी झाली. त्यानंतर आज सकाळी रानडुक्‍कर गावात आले. आपल्या मार्गात येईल त्याला चावा घेण्यास सुरवात केली. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे ग्रामस्थांत पळापळ झाली. अनेकांनी घराच्या छताचा आसरा घेतला. दरम्यानच्या काळात रानडुकराने घरात प्रवेश करून महिलेला चावा घेतला. सावध झालेल्या शेजारच्यांनी रानडुकराला याच घरात कोंडले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. तासभर छतावर आसरा घेतलेले ग्रामस्थ खाली उतरले.

रानडुक्कर मृतावस्थेत
हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षकांसह वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घरावरील पत्रे काढून दोरीच्या साह्याने रानडुकरास बाहेर काढले. त्या वेळी रानडुक्कर मृतास्थेत होते. त्याचा मृत्यू कसा झाला, याची तपासणी केली जात आहे.

Web Title: wild pig danger